Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाविकास आघाडी सरकारचे मदतीचे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा”

भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांची टीका

October 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Dr anil bonde

मुक्तपीठ टीम

शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज तुटपुंजे असून शेतकऱ्यांच्या गंभीर नुकसानीची दखल न घेताच जाहीर केलेले हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. ऐन दसऱ्याच्या आधी महाविकास आघाडी सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, अशी टीका भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस मा. डॉ. अनिल बोंडे यांनी केली.

 

मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेल्या मागणीइतकीही मदत त्यांच्या सरकारने जाहीर केलेली नाही, असेही ते म्हणाले.

 

ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक उद्धवस्त झालेच पण त्यासोबत अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पीक घेणे अशक्य आहे. ही जमीन लागवडयोग्य करण्याचा मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले. मनुष्यहानी झाली. फळ बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना झाडे पडल्यामुळे नव्याने लागवड केल्यावर अनेक वर्षे उत्पादन मिळणार नाही. तसेच मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत खूप कमी मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना या नुकसानीचा विचार केलेला नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.

 

त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत मागितली होती. तथापि, मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर आपल्या मागणीनुसार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांनी तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. घराबाहेर पडून ते शेताच्या बांधावर गेले असते तर अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी कसा उद्धवस्त झाला आहे याची त्यांना जाणीव झाली असती.

 

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने २०१९ काढलेल्या आदेशाची ठाकरे सरकारने अंमलबजावणी करावी आणि चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 


Tags: chief minister uddhav thackerayDr Anil bondefarmersउद्धव ठाकरेकाँग्रेसभाजपा किसान मोर्चाराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाशेतकरी
Previous Post

महागाई कमी झाल्याच्या मुद्द्यावर सामनातून भाजपाची खिल्ली! जुमलेबाजी-आकडेबाजी नेहमीचाच खेळ!!

Next Post

“अतिवृष्टी व पूरग्रसत्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य” – विजय वडेट्टीवार

Next Post
for Flood

"अतिवृष्टी व पूरग्रसत्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य" - विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!