मुक्तपीठ टीम
लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणावरून संपूर्ण देशात याचा निषेध केला जात आहे. विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधीनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या मागणीला पाठिंबा देत शरद पवार यांनीही आता केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी आणि उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले शरद पवार
- उत्तर प्रदेशातील बातम्या आपण वाचतो, पाहतो आहोत.
- लखीमपूरच्या घटनेचे काही व्हिडीओ सुदैवानं समोर आले.
- त्यातून एक दिसलं की शांतपणे जाणाऱ्या जमावावर काही लोकांकडून गाडी घातली जाते.
- त्यात चार शेतकऱ्यांची, काही लोकांची आणि एका पत्रकाराची हत्या होते.
असा प्रकार कधी घडलेला नव्हता. - काही लोकांनी सांगितलं की केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे चिरंजीव त्या गाडीत होते.
- ते सुरुवातीला नाकारलं गेलं.
- कारवाईची मागणी झाली.
- पण त्यावर उत्तर प्रदेश किंवा केंद्र सरकारनं काही पाऊल टाकलं नाही.
- पाच-सहा दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केली.
- त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक करावी लागली आणि हे सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर घडलं.
- अपेक्षा अशी होती की शेतकऱ्यांची हत्या झाली, सत्ताधारी पक्षातील नेत्यावर आरोप झाला तरी सत्ताधारी पक्षानं काही भूमिका घ्यावी.
- पण सत्ताधारी पक्षाकडून पहिल्यापासून फक्त बघ्याची भूमिका घेतली गेली.
शरद पवारांची मागणी
- या संपूर्ण घटनेची जबाबदार उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यायला हवी.
- केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या पदावरुन मुक्त व्हावं.
- आज त्याची गरज आहे. जेणेकरुन लोकांचा, व्यवस्था, कायदा-सुव्यवस्थेची यंत्रणा आणि सरकार म्हणून लोकांचा विश्वास राहील.