मुक्तपीठ टीम
आता वेदांचा अभ्यास करुनही एमएची पदवी मिळवणे शक्य आहे. दिल्लीच्या इग्नू म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या मानविय विद्यालयाच्या अंतर्गत संस्कृत विभागातर्फे विद्यार्थी एमए वैदिक अभ्यासाची संधी दिली आहे. भारतीय संस्कृतीतील, वेदांमधून समोर आलेल्या वैज्ञानिक संशोधनासह, मानवी सभ्यतेचे वर्णन आणि वेदांमध्ये असलेल्या चिंतनाबद्दल विद्यार्थी जागरूक होऊ शकतील, असे मत वेदाभ्यासाच्या पुरस्कर्त्यांनी व्यक्त केले आहे.
इग्नूमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय साधणारे संस्कृत विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. देवेश कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासक्रमाच्या विकासासाठी देशभरातून प्रख्यात आणि वेद विद्वानांना आमंत्रित करण्यात आले होते. ज्यात प्रा. मानसिंग (कुरुक्षेत्र), प्रा. विजय शंकर. शुक्ल (वाराणसी), प्रा. मनोज मिश्रा (जम्मू), प्रा. मुरली मनोहर पाठक (गोरखपूर), प्रा. राजेश्वर प्रसाद मिश्रा (कुरुक्षेत्र), प्रा. राजेश्वर शास्त्री मुसलगावकर (उज्जैन), प्रा. रामानुज उपाध्याय (विद्यापीठ, नवी दिल्ली), प्रा. रंजीत बेहेरा (कुरुक्षेत्र) हे सर्व सहभागी झाले.
पाठ्यक्रम निर्माण समितीचे ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मानवता विद्यालयाच्या संचालक प्रा. मालती माथूर होत्या. इग्नूचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव वैदिक अभ्यासावर आधारित या अभ्यासक्रमाबद्दल म्हणाले की, आजच्या काळात हा अभ्यासक्रम वेदांचे महत्त्व आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावेल.