मुक्तपीठ टीम
सिडको महामंडळाच्या कोरोना योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी गृहनिर्माण योजनेकरिता अर्जदारांना कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यास पुरेसा अवधी मिळावा, याकरिता सदर योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ दिल्यामुळे अर्जदारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करण्यास पुरेसा अवधी मिळणार आहे. सदर योजनेस २१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा करणे सुलभ व्हावे याकरिता सिडकोने आपल्या एम्पॅनल्ड बॅंकांमार्फत कर्जाची सुविध उपलब्ध करून दिली आहे. अधिवास प्रमाणपत्र, कोरोना योद्धा प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इ. कागदपत्रे गोळा करण्यास जाणारा वेळ विचारात घेऊन मुदतवाढ देण्यात आल्याने कोरोना योद्ध्यांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यास पुरेसा कालावधी मिळणार आहे.
सिडकोकडून १५ ऑगस्ट २०२१ रोजी कोरोना योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला असून या योजने अंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ नोडमध्ये एकूण ४४८८ घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकूण ४४८८ घरांपैकी १०८८ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित ३४०० घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता रु. २ लाख आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता रु. २.५ लाख अनामत रक्कम लागू आहे. यापूर्वी, सदर योजनेकरिता ९ सप्टेंबर २०२१ ही अंतिम मुदत होती. परंतु, अर्जदारांनी केलेल्या विनंतीवरून योजनेस ७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अनेक अर्जदारांनी कोरोना महासाथ व टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, अनामत रक्कम भरण्याकरिता काहीतरी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती सिडकोला केली होती. या विनंतीनुसार सिडकोने आपल्या एम्पॅनल्ड बॅंकांशी संपर्क साधून अर्जदारांना अनामत रक्कम भरण्याकरिता कर्ज पुरवठा करण्याबाबत सुचवले. यानंतर मे. कॅनरा बॅंक, मे. ॲक्सिस बॅंक, मे. टीजेएसबी बॅंक, साउथ इंडियन बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि पीएनबी बॅंक या बॅंकांनी अर्जदारांना अनामत रकमेसाठी कर्ज देण्यास संमती दर्शविली. कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास आणि कागदपत्रे सादर करण्यास पुरेसा अवधी मिळावा याकरिता अर्जदारांनी केलेल्या विनंतीवरून, सिडकोने सदर विशेष गृहनिर्माण योजनेस २१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
एम्पॅनल्ड बॅंकांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे
टीजेएसबी बॅंक – टोल फ्री – 1800223466, वाशी ब्रॅंच – 8451984952, सेक्टर-12 शाखा – 9594950570, सानपाडा – 8424018985, पनवेल – 8308974608, कामोठे – 7208942257
साउथ इंडियन बॅंक – 8089001127, 7008897331
पीएनबी बॅंक – 9800024840, 7710002284, 7276544885, 8850530835, 7620006489, 8928795344, 9769497874, 9309735251, 950386283
स्टेट बॅंक ऑफ इंडिया – 9870024127 , 9619994549
सदर बॅंकांची यादी व संपर्क क्रमांक https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
तथापि, अर्जदार व बॅंका यांमध्ये या संदर्भात करण्यात येणाऱ्या व्यवहारात सिडकोची कोणतीही भूमिका नसून अर्जदारांनी आपल्या जबाबादारीवर सदर बॅंकांशी व्यवहार करावा, असे सिडकोकडून कळविण्यात आले आहे.