मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या किंमतीत ६२ टक्के वाढीची घोषणा केली होती. त्यानंतर महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने सीएनजी आणि पीएनजीच्या किरकोळ किंमतीत २ रुपये प्रति किलो वाढ केली आहे. त्यामुळे आता स्वयंपाकांप्रमाणेच गाड्यांचा प्रवासही महागला आहे. त्यामुळे ही दरवाढ सीएनजी-पीएनजी ग्राहकांच्या खिशालाच आग लावणारी मानली जात आहे.
ग्राहकांच्या खिशाला आग…
- गॅस पुरवठ्याच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
- एमजीएलने सीएनजीची मूळ किंमत २ रुपये प्रति किलो आणि घरगुती पीएनजी २ रुपये प्रति युनिट किंवा एससीएमने वाढवावी लागत आहे.
- ही माहिती एमजीएलने एका निवेदनाद्वारे दिली आहे.
- मुंबईतील हजारो वाहने सीएनजीवर चालतात.
- त्यामुळे वाहतुकीच्या भाडेदरात वाढ होऊ शकते.
- पीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ लागू शकते.
तरीही गॅस पेट्रोलपेक्षा स्वस्त!
- आता मुंबईत सीएनजी सर्व करांसह ५४.५७ रुपये प्रति किलो आहे.
- दुसरीकडे, स्लॅब एका ग्राहकांसाठी पीएनजी ३२.६७ रुपये/एसएमएम आणि दोन ग्राहकांसाठी ३८.२७ रुपये/एससीएम असेल.
- या दरवाढीनंतरही सीएनजी पेट्रोलपेक्षा ६५ टक्के स्वस्त आणि डिझेलपेक्षा ४४ टक्के स्वस्त असेल.
- घरगुती पीएनजी एलपीजीपेक्षा ३४ टक्के स्वस्त आहे.
गॅस दरवाढीने काय घडणार?
- मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक सीएनजी इंधनाचा वापर करतात.
- यासोबतच बेस्टच्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील सीएनजीचा वापर करतात.
- यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे.
- सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.