Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

October 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
Chandrakant Patil

मुक्तपीठ टीम

आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व २८८ जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भारतीय जनता पार्टी सज्ज आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले.

 

ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते. तथापि, सरकार पडेल की टिकेल याचा विचार न करता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भाजपा ठामपणे काम करत आहे. विदर्भ मराठवाड्यातील प्रचंड पुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसले तरी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा दौरा सुरू झाला आहे. राज्यात मध्यावधी किंवा नियमित अशी केव्हाही विधानसभा निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभेच्याही राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपाने तयारी करावी अशी केंद्रीय नेतृत्वाची सूचना आहे. त्यानुसार संघटना काम करत आहे.

 

त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व ९७ हजार बूथमध्ये प्रत्येकी दहा पक्ष कार्यकर्त्यांच्या समित्या नेमण्याचे काम भाजपाने पूर्ण केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस ७ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील बूथ समित्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. त्यावेळी पक्षाचा संघटनात्मक विस्तार सर्वांना जाणवेल. प्रत्येक बूथमध्ये दहाजणांच्या समित्या स्थापन झाल्यावर पक्षाकडून आता प्रत्येकी १८० पर्यंत विस्तार करण्याचे काम सुरू आहे. ते म्हणाले की, मतभेदानंतरही महाविकास आघाडीचे घटक पक्ष सत्तेसाठी एकत्र राहिले आणि भाजपाच्या विरोधात एकत्र लढले तरी निवडणुकीत त्यांचा सामना करण्याची तयारी भाजपाने केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या वाढदिवसापासून ७ ऑक्टोबरपर्यंत भाजपातर्फे ‘सेवा आणि समर्पण पर्व’ साजरे करण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात एका सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. जेट मशिनचा वापर करून हे सार्वजनिक शौचालय पूर्ण स्वच्छ करण्यात आले तसेच त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. आगामी आठ दिवसात कोथरूड मतदारसंघातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची विशेष स्वच्छता करण्यात येतील आणि त्यानंतर त्यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅड वितरणासाठी यंत्रे बसविण्यात येतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

गांधी जयंतीनिमित्त त्यांनी गांधी खादी भांडारमध्ये खादीचे कापड खरेदी केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये वाचनसंस्कृतीला मदत होण्यासाठी फिरते पुस्तक घर चालविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ प्रदेशाध्यक्षांनी केला.


Tags: chandrakant patildevendra fadanvisNarendra modipravin darekarचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीप्रवीण दरेकर
Previous Post

किल्लारी भूकंपाच्या २८वर्षानंतर सुद्धा “आपत्ती व्यवस्थापना”बद्दल आपण काहीच शिकलो नाही!

Next Post

“बाळासाहेबांनी खूप दिलं…उद्धवसाहेबांनी खूप दिलं!” तरीही सुभाष साबणेंनी का सोडली शिवसेना?

Next Post
सुभाष साबणे

“बाळासाहेबांनी खूप दिलं...उद्धवसाहेबांनी खूप दिलं!” तरीही सुभाष साबणेंनी का सोडली शिवसेना?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!