Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ३०% जागा राखीव ठेवण्याची आरोग्य मंत्री टोपेंची सूचना

October 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
Rajesh Tope

मुक्तपीठ टीम

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिका-यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तीस टक्के जागा राखून ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सूचना दिल्या आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेतील वैद्यकीय अधिका-यांना राखीव जागा असाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने (मॅग्मो) केली आहे. त्या अनुषंगाने टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

 

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आदिवासी, दुर्गम ग्रामीण भागात कार्यरत वैद्यकीय अधिका-यांना प्रोत्साहन देण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सेवांतर्गत वैद्यकीय अधिका-यांसाठी राखीव जागा असणे आवश्यक आहे, त्यामुळे ग्रामीण भागात विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील, ही बाब टोपे यांनी अधोरेखित केली.

 

मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वैद्यकीय संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, संचालक डॉ. साधना तायडे, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड, पीजी सेलचे डॉ. गणेश काळे आदी उपस्थित होते.

 

त्यावर बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव सौरभ विजय यांनी मते मांडली. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय डॉक्टरांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात तीस टक्के जागा वैद्यकीय शिक्षण विभागाने राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. बैठकीस मॅग्मो संघटनेचे डॉ. गणेश काळे, डॉ. अनिल सालोक, डॉ.अशोक चव्हाण, डॉ. जयवंत लोढे, डॉ. सत्यराज दागडे, डॉ. अभिजीत होसमनी आदी उपस्थित होते.


Tags: Amit deshamukhDr. Pradeep VyasMagmo AssociationRajesh Topesaurabh vijayअमित देशमुखडॉ.प्रदीप व्यासमॅग्मो संघटनाराजेश टोपेसौरभ विजय
Previous Post

लालबहादूर शास्त्रींचे देशाला नवी दिशा देणारे विचार…नक्की वाचा!

Next Post

“शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही”: उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
ajjit pawar

"शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही": उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!