मुक्तपीठ टीम
दिल्लीत फॉर्च्युनर कारच्या मालकिणीला अखेर विमा रक्कम मिळणार आहे. विमा कंपनीनं त्या कारची दुसरी चावी सापडत नसल्यानं विम्याचा दावा अडवून ठेवला होता. तनेजा कुटुंबाच्या घराबाहेरुन त्यांची फॉर्च्यूनर कार घराबाहेरुन चोरीला गेली. त्यांच्या तक्रारीवरून दिल्लीतील विवेक विहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण विमा कंपनीने २३ लाख ३८५ रुपयांची विमा रक्कम देण्यास नकार दिला होता. अखेर ग्राहक न्यायालयाच्या दट्ट्यानंतर विमा कंपनीला नुकसानभरपाई द्यावी लागली आहे.
कारची दुसरी चावी हरवल्यामुळे दावा अडकला
- कारचा एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स नावाच्या कंपनीचा विमा होता.
- ज्याची कालावधी १ ऑगस्ट २०१३ ते ३१ जुलै २०१४ पर्यंत होती.
- विमा असताना तनेजाने कंपनीकडे दाव्याची मागणी केली. तसेच कंपनीला कारची चावीही दिली होती.
- जेव्हा कंपनीने कारची दुसरी चावी मागितली तेव्हा फिर्यादीने सांगितले की कारची दुसरी चावी घरात कुठेतरी हरवली आहे आणि ती सापडत नाही.
ग्राहक न्यायालयाने भरपाई मिळवून दिली
- पीडितेने आपले वकील राजेश शर्मा यांच्यामार्फत दिल्ली राज्य ग्राहक न्यायालय गाठले.
- १८ टक्के व्याजासह दाव्याची रक्कम परत करण्याव्यतिरिक्त, त्याने मानसिक छळासाठी २ लाख रुपये आणि खटल्यासाठी २१ हजार रुपयांची मागणी केली.
- न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून आणि कागदपत्रे तपासल्यानंतर विमा कंपनीला क्लेम रकमेच्या ७५ टक्के रक्कम सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले.