मुक्तपीठ टीम
राज्यातील तीन पक्षाचं सरकार हे घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज पक्षांचे आहे. काँग्रेस भुरटी आहे. जे मिळेल ते घेतात, ते झोलबाज आहेत. शिवसेना दगाबाज आहे, अशा शब्दात भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी आघाडीवर पुणे जिल्ह्यातील मावळातून हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, आता आघाडीतील दोन पक्षांकडून जे संकेत मिळत आहेत, त्यानुसार राज्यात कधीही निवडणुका होतील. भाजपाच्या बूथ प्रमुखाचे चेहरे पाहिल्यावर कमळच फुलेल, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.
घोटाळेबाज, झोलबाज, शिवसेना दगाबाज!
- हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे.
- काँग्रेस भुरटी आहे. जे मिळेल ते घेतात, ते झोलबाज आहेत.
- शिवसेना दगाबाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावानं मतं मागितली आणि दगाबाजी केली.
- दगाबाजीने का असेना मुख्यमंत्री झाले. दगाबाजी जरी स्थापन झालं असलं तरी ते विकास करतील असं वाटलं होतं!
आगरी, कोळी बांधवांसह महाराष्ट्रातील करोडो भक्तांची अपार श्रध्दा असलेल्या आई एकविरा देवीच्या पायथा मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मावळ दौऱ्याला सुरुवात केली. सोबत माजी राज्यमंत्री बाळा बेगडे आणि पदाधिकारी उपस्थित होते! pic.twitter.com/K3WnopRPBL
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 1, 2021
बुथप्रमुखांचे चेहरे सांगतात…कमळच फुलणार!
- मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखाचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलणार!
- मावळातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख हे बाजीप्रभू आहेत.
- बूथ प्रमुखच भाजपाच्या यशाचे मानकरी आहे. देशातील भाजपाचे जे प्रमुख आहेत, ते सर्व एका बूथचे प्रमुख आहेत.
- भाजपा कार्यकर्त्याला पोलीस, सरकारी अधिकारी त्रास देत आहेत.
- असं करु नका. ते तुमच्या हिताचं नाही.
- जो बेकायदेशीर काम करत होता, तो गृहमंत्री असला तरी आता वॉन्टेड आहे.
- पोलीस अधिकारीही वॉन्टेड आहेत, असा इशाराही शेलार यांनी पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिला.
मावळ दौऱ्यात आज मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम(बापू) कदम यांनी स्वागत केले! pic.twitter.com/QZppUsJ2mA
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 1, 2021
एमपीएससीचं माहितच नाही!
- एमपीएससी करणाऱ्या स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली.
- आई-वडिलांनी कष्ट करुन शिकवलं. पण नियुक्त्या होत नसल्याचं आत्महत्या केली.
- ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरू म्हणाले. पण त्या भरल्या नाहीत.
- एमपीएससीत किती जागा मोकळ्या आहेत, हेच यांना माहिती नाही!