मुक्तपीठ टीम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव पिंक बॉल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यानंतर मंधानाने तिच्या धावसंख्येत २० धावा जोडल्या आणि गुलाबी चेंडू कसोटीतील पहिले शतक झळकावले. भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. कोहलीने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या टीम इंडियाच्या पहिल्या पिंक बॉल कसोटीत शतक झळकावले होते. त्याने १३६ धावांची खेळी खेळली होती. पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू आहे.
भारतीय महिला संघाचा हा पहिलाच पिंक बॉलचा कसोटी सामना आहे. गुरुवारी भारतीय संघाने पहिल्या दिवशी १ विकेट गमावून १३२ धावा केल्या. पाऊस आणि खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवशी फक्त ४४.१ ओवर खेळता आली. ओपनर स्मृती मंधाना ८० आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली, पूनम राऊत १६ धावांवर नाबाद होती.
कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक
- स्मृती मंधानानं १७० चेंडूत १८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने हे शतक पूर्ण केले.
- मंधानाचे हे कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला क्रिकेटपटूचे हे पहिले शतक आहे.
- मंधानाने २१६ चेंडूत १२७ धावा केल्या.
- स्मृती आणि शेफालीची दमदार सुरुवात
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.
- स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी दमदार सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली.
- शेफालीने ६४ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या.
कसोटीत ३३.४० च्या सरासरीने धावा केल्या
- स्मृती मंधाना तिच्या कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळत आहे.
- यात स्मृतीच्या दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
- यापूर्वी तीन कसोटी सामन्यांमध्ये ३३.४० च्या सरासरीने १६७ धावा केल्या आहेत.
टी २० मधील १३ अर्धशतके
- स्मृती एकदिवसीय आणि टी -२० क्रिकेटमध्ये तिच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाते.
- स्मृतीने ६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे ४२ च्या सरासरीने २३७७ धावा केल्या ज्यात ४ शतके आणि १९ अर्धशतके समाविष्ट आहेत.
- टी -२० क्रिकेटमध्ये स्मृतीने ८१ सामन्यांमध्ये १३ अर्धशतकांच्या मदतीने १९०१ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १२१ होता.