मुक्तपीठ टीम
राज्यातील विविध भागात गुलाब चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांत लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरेंची सरकारकडे मागणी
- महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे.
- हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे.
- ही वेळ आणीबाणीची आहे.
- अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत रहातील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला-शेतकन्याला ५०,००० रूपयांची मदत
- सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी.
आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे. - प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत रहातील.
- त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल.
- परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत.
- तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra pic.twitter.com/fnCIswerMO
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2021
बाधितांना तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
- मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.
- कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले.
- काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी सांगितले.
- मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.