Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना मिळणार दिलासा, परीक्षा हुकलेल्यांना पुन्हा संधी!

September 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Marathwada

मुक्तपीठ टीम

गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात तुफान पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे २०० हून अधिक विद्यार्थ्यांना देखील मोठा फटका या पावसामुळं बसला आहे. निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. विद्यार्थ्यांनी आम्हाला पुन्हा संधी मिळावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जाईल, असा दिलासा दिला आहे.

 

परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी

  • राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
  • या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत.
  • मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग तसेच अॅग्रीसाठीच्या सीईटी परीक्षेपासून वंचित राहावं लागलं आहे.
  • ही परीक्षा २० तारखेपासून १ तारखेपर्यंत सुरू आहे.
  • अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल.
  • अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
  • पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.
  • यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे.
  • याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील.
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही.
  • विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.

 

‘महाराष्ट्राला ७ हजार कोटी रुपये द्या’, वडेट्टीवारांची मागणी

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागात शेती पाण्याखाली गेली आहे. पिकांचं नुकसान झाले आहे. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मराठवाड्यात नुकसानाची पाहणी केली आहे. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १ हजार कोटी रुपये दिले होते. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील नुकसान पाहता महाराष्ट्राला किमान ७ हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी आमची मागणी आहे.

त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना देखील आम्ही भेटणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
तसंच मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय चर्चेला येणार असल्याची माहिती त्यांनी दिली


Tags: Narendra modiShetkariuday samantUddhav ThackerayVijay Vadettiwarउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीविजय वडेट्टीवारशिक्षण मंत्री उदय सामंतशेतकरी
Previous Post

“मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवा”

Next Post

राज्यात ३,१८७ नवे रुग्ण, निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण चार जिल्ह्यांमधील!  

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ३,१८७ नवे रुग्ण, निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण चार जिल्ह्यांमधील!  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!