मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुरू करण्यात आलेल्या सेवा व समर्पण अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठाच्या वतीने राज्यभरातून ७१ हजार नेत्रदान संकल्प पत्र भरून घेण्यात येणार आहेत. जैन प्रकोष्ठ प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांनी सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जैन प्रकोष्ठाच्या वतीने “नेत्रदान संकल्प अभियान” हा विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे. पंतप्रधान मोदींजींच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्ताने घरोघरी जाऊन ७१ हजार नागरिकांना नेत्रदानाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. नेत्रदान संदर्भात जनजागृती करून नेत्रदान संकल्प पत्र भरण्यात येणार आहे. याशिवाय अजून पाच वेगवेगळे उपक्रम अनुक्रमे १) अल्पसंख्याक छात्रवृत्ती शिबिर, २) (EWS) स्वर्ण आरक्षण अभियान, ३) मुद्रा लोन मेळावा, ४) मोफत नेत्र तपासणी शिबिर, ५) अन्नदान राज्यभरात राबविण्यात येत आहे असेही भंडारी यांनी सांगितले.