मुक्तपीठ टीम
राज्यात आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मनसेच्या नेत्यांनी भाजपासोबत युती करण्याची मागणीही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे केली असताना आता मनसे आणि भाजपा युतीचा पहिला नारळ हा पालघरमध्ये फुटला आहे. पालघर भाजपा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मनसे युती
- पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुक होत आहे. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे.
- पालघर जिल्हापरिषदेत ५७ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना १८, राष्ट्रवादी १७, भाजप १२, माकप ५, बहुजन विकास आघाडी ४, तर काँग्रेसचा एक असे सदस्य निवडून आलेले आहेत.
- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष मिळून बहुमताचा आकडा पार करत महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे.
- मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषदेतील १५ सदस्य, तर पालघर, डहाणू, वाडा आणि वसई या चार पंचायत समितींमधील १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं होतं.