मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी जनतेला संबोधितही केलं. पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेच्या पायलट प्रकल्पाची घोषणा केली होती.
सध्या, प्रारंभिक टप्प्यात सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू केली जात आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पीएम डीएचएमचे लाँचिंग केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या सहमतीने आरोग्य नोंदीं, प्रवेश आणि इतर देवाणघेवाण या कार्याची क्षमता वाढवली जाईल.
आयुष्यमान भारत डिजिटलविषयी सविस्त माहिती
- आयुष्यमान भारत डिजिटल अंतर्गत, प्रत्येक नागरिकाकडे आरोग्य ओळखपत्र असेल.
- हे आरोग्य ओळखपत्र त्यांचे आरोग्य खाते म्हणूनही काम करेल.
- ज्याद्वारे वैयक्तीक आरोग्य नोंदी जोडल्या जाऊ शकतात आणि मोबाईल अॅपच्या मदतीने पाहिल्या जाऊ शकतात.
- हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्री यांच्याकडून हेल्थकेअरची सुविधा दिली जाईल.
- यामुळे डॉक्टर/ रुग्णालये आणि आरोग्य सेवा देणार्यांसाठी हे सुलभ होईल.