Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोमवारी शेतकऱ्यांचा भारत बंद, जोरदार तयारी, विरोधकांचा पाठिंबा!

September 5, 2026
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
शेतकरी संघटना

मुक्तपीठ टीम

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी शेतकरी संघटनांनी उद्या म्हणजे सोमवार, २७ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली ४० शेतकरी संघटनांनी लोकांना ‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्षांनीही आता कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्षात सामील होण्याचे संकेत दिले आहेत.

 

शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला काँग्रेस, माकप, राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेस या विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकारशी राजकीय लढाई लढण्याची रणनीती स्पष्ट केली आहे.

 

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे १० महिने !

  • २६ सप्टेंबरला म्हणजे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १० महिने झाले आहेत.
  • भारत बंदमुळे त्यांचे शेतकरी आंदोलन अधिक बळकट होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
  • संयुक्त किसान मोर्चाकडून देशाच्या विविध भागांतील शेतकरी संघटनांकडून समाजातील विविध घटकांशी संपर्क साधला जात आहे.

 

या राज्यांमध्ये भारत बंदचे परिणाम दिसून येतील…

  • ज्या राज्यांमध्ये विरोधी सरकार आहे तेथे भारत बंदचा परिणाम अधिक दिसून येऊ शकतो.
  • पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणेच माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही शेतकरी संघटनांच्या भारत बंदमध्ये सामील होण्याचे जाहीर केले आहे.
  • बिहारमधील राजदचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी बंद दरम्यान तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे.
  • आंध्र प्रदेशातील तेलुगू देशम, दिल्लीतील आम आदमी पार्टी, कर्नाटकातील जेडीएस, तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमके या पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला आहे आणि केंद्र सरकारकडे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे.

 

भारत बंदला या संघटनांचे समर्थन

  • ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने ‘भारत बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देशातील अनेक बँकांमध्ये २७ सप्टेंबर रोजी कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, भारत बंदच्या योजनेत कामगार संघटना, कामगार आणि विद्यार्थी संघटना, महिला संघटना आणि वाहतूकदार संघटना यांचा सहभाग आहे.

Tags: Farmers protestfarmers unionIndiamuktpeethकेंद्रीय कृषी कायदाभारत बंदमुक्तपीठशेतकरी आंदोलनशेतकरी संघटना
Previous Post

ह्रदयविकाराचा झटका आणि वेळीच उपचाराच्या प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत!

Next Post

मुंबईच्या तुरुंगात सहा मुलांसह ३९ महिला कैद्यांना कोरोना!

Next Post
byculla jail

मुंबईच्या तुरुंगात सहा मुलांसह ३९ महिला कैद्यांना कोरोना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!