Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Daughter’s Day: कन्या दिवस असूद्या लेकीच्या मनाजोगता!

September 26, 2021
in featured, Trending, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
daughters day

रोहिणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम

आज आंतराष्ट्रीय कन्या दिवस!
मुलगी शिकली, प्रगती झाली, बेटी बचाओ बेटी पढाओ अशी अनेक घोषवाक्यं मुलींच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण वापरतो. कारण देशात परिस्थितीच तशी आहे. काही माणसं मुला-मुलींमध्ये भेदभाव करतात. अनेक मात्र लेकींना लेकापेक्षाही जास्त आपुलकीनं महत्व देत वाढवतात. अशांसाठी आज कन्या दिवस म्हणजेच Daughter’s Dayची ओळख करून देत आहोत.

कन्या दिवस कधी आणि का साजरा करतात?

दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी कन्या दिन साजरा केला जातो. या वर्षी २६ सप्टेंबर म्हणजे आज कन्या दिन साजरा केला जाईल. कन्या दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश मुलींना मुलगा म्हणून समान महत्त्व आणि आदर देणे हा आहे. या विशेष दिवशी मुलींना त्यांची कामगिरी आणि त्यांचे महत्त्व सांगितले जाते. त्याच वेळी, मुलींना असे वाटते की, त्या कोणत्याही प्रकारे मुलांपेक्षा कमी नाहीत. मुलींना पालक भेटवस्तू देतात. त्यांच्यासोबत हा दिवस साजरा करतात.

भारतात मुलींना वेगळे महत्त्व दिले जाते. पूर्वी मुलींचा बाल विवाह करायचे. त्यांची भूमिका फक्त चूल आणि मूल इथ पर्यंतच मर्यादित होती. ही वाईट प्रथा आजही देशात अनेक ठिकाणी सुरू आहे, पण एका मोठ्या वर्गाची विचारसरणी बदलली आहे, त्यामुळे लोकांना जागरूक करण्यासाठी कन्या दिनालाही खूप महत्त्व आहे.

 

कन्या दिवस कसा साजरा करावा?

  • तसे लेकीचे लाड पुरवले जातातच, पण कन्या दिवशी फक्त तिचंच ऐका. तिच्या मनासारखं वागा.
  • कन्या म्हणजे लेक ही प्रत्येक पित्याची राजकन्याच! त्यामुळे किमान या दिवशी तिला खरोखरच राज्यकन्येसारखंच वागवा.
  • शक्य असेल तर तिला तिच्या उपयोगाची आणि आवडीची भेटवस्तू देऊ शकतात.
  • तिच्या आवडीचे खास खाद्यपदार्थ घरी बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी तिला हॉटेलमध्ये घेऊन जाऊ शकता.
  • नेहमी वेळ दिलाच पाहिजे, पण आज मुलींसोबत थोडा जास्त चांगला वेळ घालवा.
  • मुलींना सांगा, की त्या मुलांपेक्षा कमी नाहीत आणि पालकांसाठी त्यांच्या आयुष्यात त्या किती महत्त्वाच्या आहेत.
  • मुला -मुलींवर समान प्रेम आणि समान सन्मान कसा करावा हे पालकांनी सांगितले पाहिजे.
  • पालकांनी असेही सांगितले पाहिजे की मुलींनी कोणत्याही प्रकारे घाबरू नये आणि प्रत्येक समस्येचा खंबीरपणे सामना केला पाहिजे.

Tags: daughters daymuktpeethकन्या दिवसकन्यादिनमुक्तपीठलाडलीलेक लाडकी
Previous Post

‘रश्मी रॉकेट’मधील शरीरयष्टीमुळे तापसी पन्नूचे ट्रोलिंग…दिलं सणसणीत उत्तर!

Next Post

“रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे”

Next Post
blood donation

"रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!