मुक्तपीठ टीम
देशात इलेक्ट्रिक वाहने वाढवण्यासाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. या वाहनांचा वापर वेगानं वाढवण्यासाटी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी म्हणाले, पुढील ३ ते ४ महिन्यांत, एक निर्देश जारी करेन, ज्यामुळे सर्व वाहन उत्पादकांना फ्लेक्स इंजिन हे अनिवार्य असेल.
फ्लेक्स इंजिन म्हणजे लवचिक इंधन वाहन जे एकापेक्षा जास्त इंधनावर चालू शकतात. ब्राझीलसह जगातील अनेक देशांमध्ये हे तंत्रज्ञान यापूर्वीच स्वीकारले गेले आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून राहणं कमी होईल आणि प्रदूषण नियंत्रित करण्यातही मदत होईल. तसेच वाहन चालवण्याचा खर्चही कमी होईल.
केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालय या योजनेवर आधीच काम करत आहे. गडकरींनी यापूर्वी म्हटले आहे की, भारत इथेनॉलवर आधारित ‘फ्लेक्स इंजिन’ ला परवानगी देईल, जे स्थानिक कृषी उत्पादनांचा वापर करणारी इलेक्ट्रिक वाहने आहेत ती जीवाश्म इंधनांचा वापर करत नाहीत. ब्राझील, अमेरिका आणि कॅनडा यासारख्या देशांमध्ये फ्लेक्स इंजिन आहेत जे कृषी उत्पादनांमधून तयार होणाऱ्या इंधनांवर चालवले जातात.
गडकरींचा मास्टर प्लान: एक इंजिन, अनेक इंधनं!
- जून २०२१ च्या अहवालानुसार, गडकरींनी मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि टोयोटासारख्या वाहन उत्पादकांना पर्यायी इंधनावर चालणारी वाहने विकसित करण्याचे आवाहन केले आहे. २. स्थानिक पातळीवर उत्पादित इथेनॉलच्या वापरामुळे देशाला फायदा होईल.
- सध्या भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे.
- जर नवीन प्रणाली अंमलात आली तर पर्यावरण, खर्च आणि प्रदूषणाच्या होणाऱ्या समस्येवर फायदे होतील.
- टीव्हीएस आणि बजाजसह भारतीय वाहन उत्पादक वेगानं तंत्रज्ञान विकसित करत आहेत आणि त्यांनी केवळ इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकीही विकसित केल्या आहेत.