मुक्तपीठ टीम
काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातमधील अदाणी समूह चालवत असलेल्या मुंद्रा बंदरावर पकडण्यात आलेल्या २१,००० कोटी रुपयांच्या हेरोइन प्रकरणाची तसेच अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या भारतात लाचखोरीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या बाबींना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगत पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्पष्टीकरणाची मागणीही केली आहे.
राहुल गांधी ड्रगप्रकरणी आक्रमक
- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही हेरोइन प्रकरणी सरकारवर निशाणा साधत ट्विट केले आहे.
- ‘देशाला वाळवी लागली आहे.
- केंद्र सरकार मित्रांच्या मांडीवर झोपले आहे.
- या विषाने शेकडो कुटुंबे उध्वस्त होण्यास केंद्र सरकार जबाबदार नाही का?
देश को घुन लगा है और केंद्र सरकार मित्रों की गोद में सो रही है।
क्या इस ज़हर से बर्बाद हो रहे सैकड़ों परिवारों की ज़िम्मेदारी केंद्र सरकार की नहीं है? pic.twitter.com/AeJEX0UB5x
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 22, 2021
अंमली पदार्थांचा सुळसुळाट, रोजगार मात्र गायब!
- काँग्रेसचे मीडिया विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत भाजपा सरकारच्या कारभारावर घणाघाती हल्ला चढवला हेरोइनमधून हे स्पष्ट होते की, ड्रग डीलर्स देशातील तरुणांना ड्रग्जच्या आगीत भिरकावत आहेत.
- त्याचवेळी, अॅमेझॉनशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणामुळे हे स्पष्ट झाले आहे की,कोट्यवधी लहान दुकानदार, एमएसएमईसह तरुणांचा रोजगार कसा हिसकावला जात आहे.
अॅमेझॉनचे कायदेशीर शुल्काचे साडे हजार कोटी नेमके कुणाला?
- राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित या विषयावर पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावे.
- अॅमेझॉन या परदेशी ई-कॉमर्स कंपनीने गेल्या दोन वर्षांत भारतात कायदेशीर शुल्काच्या नावावर ८,५४६ कोटी रुपये दिले.
- सुरजेवाला म्हणाले की, अॅमेझॉनद्वारे ८,५४६कोटी रुपयांच्या तथाकथित लाच भारतात कोणत्या अधिकाऱ्याला किंवा व्हाइट कॉलर राजकीय नेत्याला देण्यात आली?
लहान दुकानदारांना नष्ट करण्यासाठी लाच
- सुरजेवाला यांनी आरोप केला की ही रक्कम कायदा आणि नियम बदलण्यासाठी देण्यात आली आहे जेणेकरून छोट्या दुकानदारांचा आणि उद्योगांचा व्यवसाय ठप्प होईल आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपनीचा व्यवसाय सुरु राहिल.
- ते म्हणाले की अॅमेझॉनच्या सहा कंपन्यांनी मिळून ८,५४६ कोटी रुपये दिले आणि म्हणून त्यांच्या परस्परसंबंधाची चौकशी केली पाहिजे.
- वॉशिंग्टन भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी अमेझॉनच्या कथित लाचखोरी घोटाळ्यातील गुन्हेगारी तपासाची बाब अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे घेतील का, असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले की ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाची या लाच प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न उपस्थित
- गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पकडलेल्या हेरोइनच्या सर्वात मोठ्या खेपाच्या मुद्द्यावर, सुरजेवाला यांनी प्रश्न विचारला की देशातील मगर कोण आहे जो २१,००० कोटी रुपयांची हेरोइन ऑर्डर करत आहे?
- सर्व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, डीआरआय, ईडी, सीबीआय आणि आयबी झोपलेले आहेत की त्यांना विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर सूड घेण्यासाठी वेळ मिळत नाही?
- सुरजेवाला म्हणाले की, अदानी मुंद्रा बंदरावर उघडकीस आलेले प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी खेळत आहे, कारण त्याचा तालिबान आणि अफगाणिस्तानशी संबंध आहे.