मुक्तपीठ टीम
यात्रेकरूंसाठी एक चांगली बातमी आहे. आयआरसीटीसीने हिंदू श्रद्धाळूंसाठी चांगली बातमी दिली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने चारधाम यात्रेसाठी विशेष ट्रेन सुरू केली आहे. ‘श्री रामायण यात्रा ट्रेन’ चे यश पाहता रेल्वेने ही सेवा सुरू केली आहे. १८ सप्टेंबर रोजी दिल्ली सफदरगंज रेल्वे स्टेशनपासून १६ दिवसांची पहिली मोहीम सुरू झाली आहे.
चारधामसाठी ८५०० किमी प्रवास
- चारधाम यात्रेमध्ये ऋषिकेश, रामजन्मभूमी, हनुमान गढी, सरयू आरती, नंदीग्राम, गंगा, वाराणसी ला जायला मिळेल.
- हरिद्वारसह गंगा घाट, मंदिरे आणि गंगा आरती, लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट यांचा समावेश असेल.
- याशिवाय काशी विश्वनाथ मंदिर, पुरीसह जगन्नाथ मंदिर, पुरीचा गोल्डन बीच, कोणार्क सूर्य मंदिर आणि चंद्रभागा बीच, रामेश्वरम, रामनाथस्वामी मंदिर, धनुष्कोडी, द्वारकाधीश मंदिरासह द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग, शिवराजपूर बीच आणि बेट द्वार येथे भेटी दिल्या जातील.
- या दौऱ्यात प्रवासी सुमारे ८५०० किमी अंतराचा प्रवास करतील.
प्रवाशांना या सुविधा मिळतील
अत्याधुनिक डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेनमध्ये दोन डायनिंग रेस्टॉरंट्स, एक किचन, डब्यातील शॉवर क्यूबिकल्स, सेन्सर आधारित वॉशरूम, फूट मसाज यासह आश्चर्यकारक सुविधा आहेत. रेल्वेच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तेथे सुरक्षा रक्षकही उपस्थित असतील. आयआरसीटीसीने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘देखो अपना देश’ विशेष ट्रेन सुरू केली आहे.
प्रवासाच्या पॅकेजविषयी सविस्तर माहिती
- यामध्ये पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती ७८,५८५ रुपयांपासून सुरू होते.
- पॅकेजमध्ये एसी कोचमध्ये प्रवास, डिलक्स हॉटेल्समध्ये राहण्याची सोय, अन्न, पर्यटन स्थळे, प्रवास विमा आणि आयआरसीटीसी टूर मॅनेजर्सची सेवा यांचा समावेश आहे.
पाहा व्हिडीओ: