मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने दहशतवादी हल्ले, कट आणि फंडिंगच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत १६८ जणांना अटक केली आहे. भारतात IS या दहशतवादी संघटनेने इंटरनेटच्या माध्यमातून देशातल्या तरुण पिढीला आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे. ३१ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. नवीन प्रकरण हे जूनमध्ये उघड झालं आहे. याप्रकरणी सुनावणीनंतर २७ आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेली माहिती खालीलप्रमाणे
- IS भारतात सातत्याने ऑनलाईनच्या माध्यमातून कट्टरतावादाचं बीज तरुणांमध्ये पेरत आहे.
- फेसबूक, ट्विटर आणि इंस्ट्राग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर त्यांच्याकडून केला जात आहे.
- तरुणांनी अशा कोणत्याही अपप्रचारांना बळी पडू नये, असं आवाहन आम्ही करतो.
दिल्लीत दहशतवादी कारवायांचा कट उधळला
- दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी (१४ सप्टेंबरला) पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या कटाचा भांडाफोड केला आहे.
- पाकिस्तानस्थित ISI या दहशतवादी संघटनेनं प्रशिक्षण दिलेल्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
- हे दहशतवादी सणावारांना अनेक ठिकाणी स्फोट घडवण्याच्या तयारीत होते.
- जान मोहम्मद शेख (४७) उर्फ ‘समीर’, ओसामा (२२), मूलचंद (४७), जीशान कमर (२८), मोहम्मद अबु बकर (२३) और मोहम्मद आमिर जावेद (३१) अशी दहशतवाद्यांची नावं आहेत, ज्यांना दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागांमधून छापे टाकून अटक करण्यात आलं आहे.