मुक्तपीठ टीम
दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांच्या क्षेत्रातील एक मोठे नाव मानले जाणाऱ्या टीव्हीएस मोटरने भारतातील आणि जगातील महत्त्वाकांक्षी युवा पिढीसाठी १२५ सीसी सेगमेंटमध्ये, अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज ‘टीव्हीएस रेडर’ (TVS Raider) सादर करत असल्याची घोषणा केली आहे. अतिशय ठळकपणे युवा आणि स्पोर्टी असलेली ही मोटरसायकल आपल्या श्रेणीत पहिल्यांदाच आणल्या जात असलेल्या अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यामध्ये रिव्हर्स एलसीडी डिजिटल स्पीडोमीटर, व्हॉइस असिस्टसह ५-इंची टीएफटी क्लस्टर (पर्यायी), वेगवेगळे राईड मोड्स आणि या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिली जात असलेली अंडर-सीट स्टोरेजची सुविधा यांचा यामध्ये समावेश आहे.
- या श्रेणीतील सर्वोत्तम ऍक्सिलरेशन आणि या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच आणले जात असलेले राईड मोड्स, रिव्हर्स एलसीडी क्लस्टर यांनी सुसज्ज
- टीव्हीएस intelliGO (स्टार्ट/स्टॉप) आणि ETFi सह शक्तिशाली, आधुनिक ३व्ही इंजिनमार्फत लक्षणीय मायलेज मिळवून देते.
- आगामी टीव्हीएस SMARTXONNECTTM प्रकारात टीएफटी क्लस्टर, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आणि व्हॉइस असिस्ट या सुविधा दिल्या जातील.
प्रमुख वैशिष्ट्ये
- रिव्हर्स एलसीडी डिजिटल स्पीडोमीटर
- वेगवेगळे राईड मोड्स – (इको आणि पॉवर)
- सहज उपयोगात आणता येईल असे अंडर सीट स्टोरेज
- आधुनिक ३व्ही इंजिन
- मोनो-शॉक सस्पेन्शन
- अधिक रुंद स्प्लिट सीट
- ETFi
- intelliGO
- इंजिन इन्हिबिटरसह साईड स्टॅन्ड इंडिकेटर
- हेल्मेट रिमाइंडर
- आगामी टीव्हीएस SMARTXONNECTTM मध्ये ५ इंची टीएफटी क्लस्टर, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, व्हॉइस असिस्ट आणि नेव्हिगेशन या सुविधा दिल्या जातील.
टीव्हीएस मोटर कंपनीचे डायरेक्टर आणि सीईओ श्री. के. एन. राधाकृष्णन यांनी सांगितले, “टीव्हीएस मोटर कंपनी जगातील जवळपास प्रत्येक खंडातील ग्राहकांना उत्पादने व सेवा पुरवते. टीव्हीएस रेडरसह आमच्या पोर्टफोलिओमध्ये नव्या जागतिक मोटरसायकल प्लॅटफॉर्मचा समावेश करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजच्या युवा आणि डिजिटल विश्वात रुळणाऱ्या Gen Zसाठी ही गाडी डिझाईन करण्यात आली आहे. त्यांना अनुसरून या गाडीमध्ये अत्याधुनिक वाहन व कनेक्टेड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मला पक्की खात्री आहे की भारत आणि जगभरातील आमच्या युवा ग्राहकांना टीव्हीएस रेडर खूप आवडेल.”
टीव्हीएस मोटर कंपनीचे कॉम्युटर्स, कॉर्पोरेट ब्रँड अँड डीलर ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग) श्री. अनिरुद्ध हलदर यांनी सांगितले, “टीव्हीएस मोटर कंपनी नेहमीच Gen Zला आपले प्रमुख ग्राहक मानत आली आहे. इव्ही – टीव्हीएस आयक्यूब आणि टीव्हीएस अपाचे सीरिजमधील टीव्हीएस रेसिंग व टीव्हीएस एनटीओआरक्यू १२५ यांसारख्या आमच्या ब्रँड्सचा समावेश Gen Zच्या सर्वात आवडीच्या ब्रँड्समध्ये होतो. नेकेड स्ट्रीट स्टायलिंग, श्रेणीतील सर्वोत्तम ऍक्सिलरेशन, राईड मोड्स आणि मोनो-शॉकवर आधारित राईड-हँडलिंग व या सर्वांसह टीव्हीएस intelliGO व ETFi चलित मायलेज कामगिरी या सर्व वैशिष्ट्यांनी आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण टीव्हीएस रेडर पुन्हा एकदा त्यांचे लक्ष वेधून घेणार आहे. मला पक्की खात्री आहे की अतिशय आगळेवेगळे अनिमलिस्टिक हेडलाईट आणि या श्रेणीतील पहिले रिव्हर्स एलसीडी क्लस्टर हे टीव्हीएस रेडरचे ठळक आणि अनोखे राईड कॅरॅक्टर आमच्या ग्राहकांना खूप आवडेल. आम्ही SMARTXONNECTTM देखील आणणार आहोत, ज्यामध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी व नेव्हिगेशन व व्हॉइस असिस्ट या सुविधा असतील. Gen Zच्याच शब्दात सांगायचे झाले तर, टीव्हीएस रेडर ही एक ‘विकेड राईड’ आहे!”
स्टाईल
एका अनोख्या आणि उठावदार डिझाईन संकल्पनेसह टीव्हीएस रेडर टीव्हीएस मोटर कंपनीचे अभिनव रचना संकल्पनांवर भर देण्याचे धोरण दर्शवते. अतिशय आगळीवेगळी माचो पर्सनॅलिटी आणि ही संकल्पना दर्शवणारा विशेष लोगो या गाडीमध्ये देण्यात आला आहे. मजबूत आणि स्कल्पटेड टॅंक प्रोफाइलमुळे टीव्हीएस रेडरला एक मस्क्युलर आणि भरीव स्वरूप मिळते. हे सर्व असून देखील ही स्पोर्टी, कॉम्पॅक्ट आणि अजैल मोटरसायकल तुम्ही रोजच्यासाठी वापरू शकता. सुस्पष्ट व मोठे हेडलॅम्प आणि टेललॅम्प हे टीव्हीएस रेडरच्या रचनेतील महत्त्वाचे घटक आहेत. खास डिझाईन करण्यात आलेली टेक्श्चर्स आणि फिनिशेस यासोबत उत्फुल्ल रंगसंगती हे या स्पोर्टी आणि ऊर्जादायी डिझाईनचे अविभाज्य पैलू आहेत.
कामगिरी
आधुनिक १२४.८ सीसी एअर आणि ऑइल-कूल्ड ३व्ही इंजिन टीव्हीएस रेडरमध्ये असून ते या गाडीला ७५०० आरपीएमला ८.३७ केडब्ल्यू इतकी जास्तीत जास्त शक्ती व ६००० आरपीएमला ११.२ एनएम टॉर्क देते. ५.९ सेकंदात ० ते ६० किमी/तास इतके या श्रेणीतील सर्वोत्तम ऍक्सिलरेशन आणि प्रति तास ९९ किमीचा सर्वात जास्त स्पीड आहे. गॅस-चार्ज्ड ५-स्टेप ऍडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेन्शन, लो फ्रिक्शन फ्रंट सस्पेन्शन, स्प्लिट सीट, ५-स्पीड गियरबॉक्स आणि १७ इंचांचे अलॉय चंकी वाईड टायर्स यामुळे ही गाडी अतिशय आरामशीर असून ती सहज हाताळता येते.
राईड मोड्ससह रिव्हर्स एलसीडी डिजिटल स्पीडोमीटर हे आधुनिक उच्च तंत्रज्ञानयुक्त गॅजेट असून यामध्ये सर्व तपशील अगदी अचूक मिळतात आणि सहज वाचता येतात. टीव्हीएस SMARTXONNECTTM रेडरमध्ये टीव्हीएस ५-इंची टीएफटी क्लस्टरचा पर्याय मिळतो. यामध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी व व्हॉइस असिस्ट या सुविधा मिळतात. कोणतीही तडजोड करावी न लागता सर्व लाभांचा आनंद घेता यावा यासाठी स्विच क्लस्टर, फूटपग्स व यांत्रिकी तपशील यांचा रचनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आराम, सुरक्षा आणि सुविधा
टीव्हीएस रेडरच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीला साजेशी तिची इंधन बचत क्षमता आहे. इकोथ्रस्ट फ्युएल इंजेक्शन (ETFi) तंत्रज्ञानामुळे उत्तम मायलेज, अधिक चांगली स्टार्टबिलिटी आणि टिकाऊपणा मिळतो. टीव्हीएस intelliGO गाडी चालवण्यातील आरामदायीपणा व मायलेज वाढवते, ट्रॅफिक सिग्नल्स किंवा इतर काही कारणांमुळे गाडी बराच काळ थांबून राहत असेल तर इंजिन इंटेलिजंटली बंद होते आणि एमिशन कमी होते.
टीव्हीएस रेडरचे एर्गोनॉमिक्स विकसित करताना रायडरला जास्तीत जास्त आराम आणि सुविधा मिळावी यावर भर देण्यात आला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीच्या परफॉर्मन्स मोटरसायकल डीएनएला अनुसरून रुंद व्हीलबेसवर उंची संतुलित करण्यात आलेली लो सीट, अगदी योग्य एर्गोनॉमिक्स त्रिकोण आणि मोनो-शॉक यामुळे राईड आणि गाडी हाताळणी खूप सहज शक्य होते. एक्झॉस्ट डिझाईन या मोटरसायकलची मजबुती दर्शवते. या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच अंडर-सीट स्टोरेजची सुविधा या गाडीत देण्यात आली आहे, तुम्ही तुमच्या आवश्यक वस्तू याठिकाणी सुरक्षित ठेवू शकता, इंजिन इन्हिबिटरसह साईड स्टॅन्ड इंडिकेटर, हेल्मेट रिमाइंडर आणि यूएसबी चार्जर (पर्यायी) या सुविधा देऊन परिपूर्ण राईड अनुभव प्रदान करण्यात आला आहे.
टीव्हीएस रेडरचे ड्रम आणि डिस्क हे दोन प्रकार आहेत आणि किंमत ७७,५०० रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) पुढे आहे. यामध्ये स्ट्रायकिंग रेड, ब्लेझिंग ब्ल्यू, विकेड ब्लॅक आणि फायरी यलो हे रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.