मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी (शुक्रवारी दि. १७ सप्टेंबर २०२१) कोरोनाविरोधी लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. ९ तासात २ कोटीहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. हा आकडा आणखी वाढण्याचा दावा केला जात आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत १ कोटीहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं होतं. १ सेकंदाला ५२७ हून अधिक नागरिकांचं लसीकरण केलं गेलं आहे. तासाला १९ लाख हून अधिक लसीकरणाचे डोस दिले गेले आहेत.
Historic 17th September !
India’s wonderful gift to Hon PM @narendramodi ji on his birthday & new record of single day vaccination !
Crossed Europe vaccination too!
1 Day
9 hours
2 Crore+ Vaccine doses administered & counting.:#ModiHaiToMumkinHai #LargestVaccinationDrive pic.twitter.com/hshNAJmFSP— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2021
राज्यांना ७७.७७ कोटीहून अधिक लसींचा पुरवठा
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना ७७.७७ कोटीहून अधिक लसींचा पुरवठा केला गेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसंच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे अजूनही ६.१७ कोटीहून अधिक लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
चौथ्या दिवशी लसीकरणाचा विक्रम
२७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरला १ कोटीहून अधिक लसीकरणाचे डोस दिले गेले आहेत. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्यासंदर्भातलं आवाहन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची ही भेट असेल, असंही त्यांनी नमूद केलं होतं. यानिमित्ताने भाजपनेही सक्रीय होत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पुढाकार घेतला होता.
A 30 second sample of India’s vaccination drive today.
Almost 19k in 30 secs alone pic.twitter.com/ij9rM8Rhzv— Padmaja joshi (@PadmajaJoshi) September 17, 2021
२० दिवसांचं सेवा आणि समर्पण अभियान
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २० दिवसांचं सेवा आणि समर्पण अभियान सुरु केलं आहे. हे अभियान ७ ऑक्टोबरपर्यंत सुरु असेल.