मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचं भूमीपूजन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, उदय सामंत, इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे उपस्थित होते. ४५ वर्षात इमारतीचं दुसऱ्यांदा उद्घाटन असा प्रकार आता होणार नाही, अब्दुलजी आणखी २० कोटी मिळतील पण मला त्याचा हिशोब हवाय, जे करायचं ते सरळ करेन, मला इकडे ही इमारत उभी राहिलेली पाहिजे म्हणजे पाहिजेच. दया माया चालणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
- मुख्यमंत्र्यांनी निधी देण्यासाठी ३ अटी घातल्या.
- इमारतीच्या कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे.
- काम झाल्यानंतर कारभाराचा दर्जासुद्धा उत्तम असला पाहिजे.
- ही इमारत वेळेत पूर्ण झाली पाहिजे.
- आणि हे जर मान्य असेल तर मी पैसा कमी पडू देणार नाही. पण मला तारखा द्याव्या लागतील. तारखेवर कामं पूर्ण झाली तर पैसे मिळतील, असंही त्यांनी सांगितलं.
- जे काही गरजेचं आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही.
- वातावरणातला बदल हे दुर्भाग्य आहे आपलं.
- अतिवृष्टीसुद्धा अशी होतेय की काही दिवसांचा पाऊस काही तासात पडतोय.
- जिल्हा परिषद हे जनतेची सेवा करणारं मंदिर आहे. याचं पावित्र्य जपलं पाहिजे.
- मराठवाड्यात संतपीठ पाहिजेच, मराठवाडा संतांची भूमी आहे. जनता बघायला पाहिजे असं कार्यालय झालं पाहिजे.
- मी मुंबईत एक वार्ड ऑफिसचं उद्घाटन केलं. ते मला आवडलं कारण तिथे व्यायाम करण्यासाठी जिम बनवली आहे. इथे सुद्धा तशा गोष्टी झाल्या पाहिजेत.