मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे मास्क आपल्या वेशभुषेचा अविभाज्य भाग झाले आहेत. कुठेही जायचे असेल तर मास्क पाहिजेच पाहिजे, अशी सध्याची स्थिती आहे. एकामागोमाग एक लाटा उसळत असल्याने मधल्या कालावधीत कोरोना कमी झाला तरी मास्क काही काढता येत नाही. त्यामुळेच मास्क कधीपर्यंत असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असतो. आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यांच्या मते, आपल्याला पुढील वर्षापर्यंत तरी मास्क घालावाच लागेल. लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. सर्वजण कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण करत आहेत. परंतु संपूर्ण लसीकरण होण्यास आणखी वेळ लागेल. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत सर्वांना मास्क वापरावा लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढच्या वर्षीही मास्क बंधनकारक
• निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी मास्क वापराबाबत माहिती दिली आहे.
• कोरोनाविरूद्ध लढाईमध्ये मास्क, लस, योग्य उपचार आणि सुरक्षा नियमांचे पालन अत्यंत आवश्यक आहे असे ते म्हणाले.
• पुढच्या वर्षीदेखील भारतातील लोकांना मास्क घालावा लागेल असे त्यांनी सांगितले.
• इतक्या लवकर मास्कपासून सुटका होणार नाही असे ते म्हणाले.
तिसऱ्या लाटेची शक्यता
• डॉ. पॉल यांच्या मते तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही.
• यासाठी सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे आणि मास्क घालणे गरजेचे आहे.
• डॉ. पॉल म्हणाले की भारतात कोरोनाची तिसरी लाट नाकारता येणार नाही.
• लसीकरणाद्वारे नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.
• आता सणांचे दिवस आहेत, त्यामुळे डॉ. पॉल यांनी नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.
• या काळात जर कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे केले नाही तर कोरोनाचा प्रसार आणखी वाढू शकतो.
• यासाठी नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे.
बांगलादेशात शाळा उघडल्या जात असताना युनिसेफने मास्क नक्की वापरायचा सल्ला दिला आहे:
Mask on! 😷
As #SchoolsReopen, it is a must that we make sure every child has an access to adequate healthcare and health education to protect themselves and others from #COVID19. 🙌 pic.twitter.com/UbrNE0HJTv
— UNICEF Bangladesh (@UNICEFBD) September 11, 2021