मुक्तपीठ टीम
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत फिटर, कारपेंटर, वेल्डर, सीओपीए, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट, प्लंबर, पेंटर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, एमएमटीएम, डीझेल मेकॅनिक, उपहोलस्टेरेर (ट्रिमर) या पदांवर एकूण ३३९ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. नोकरीचे ठिकाण नागपूर आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://secr.indianrailways.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.