मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविडवरील राज्य कृतीदलाने “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे रविवारी आयोजित केले होते. यावेळी याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. . त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी तसंच उपस्थित डॉक्टरांशी संवादही साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर टीका केली आहे.अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांना सुनावले.
मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा. संयम धरा
- मला थोडसं आश्चर्य वाटतं. आपण सर्व गोष्टींची काळजी घेत असताना काही लोकांना अनेक गोष्टींची घाई झाली आहे.
- हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, हे असं आहे, ते तसं आहे, असं काही लोक म्हणत आहेत.
- पण, मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा. संयम धरा. आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जात आहोत.
- मग अशावेळी घाई गर्दी केली तर आपण आणखी काही वर्षे, काही महिने या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही.
जनतेच्या जीवाशी खेळू नका
- राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत.
- पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी आहे.
- त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा.
- अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा.
- राजकारण आपल्या सर्वांचं होतं.
- पण जीव जनतेचा जातो.
- जनतेच्या जीवाशी खेळू नका.
- आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा.
शत्रू पूर्णपणे पराभूत झालेला नाही
- तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे.
- दुर्देवाने ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी यादृष्टीने उपाययोजना आणि प्रयत्न सुरू आहेत.
- आज कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे.
- जगभरात तिसऱ्या लाटेचे थैमान सुरु आहे.
- अशा परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- तिसरी लाट आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी हा त्यामागचा प्रयत्न आहे.
- आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत झालेला नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक.
कोरोनाविरुद्धच्या युद्धात शस्त्रे परजवून ठेवण्याची हीच वेळ
- आता सणवाराचे दिवस सुरू झाले आहेत.
- गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत.
- गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली.
- यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.
- आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच.
- ती थोपवायची आहे.
- राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे.
- कोरोना विरुद्ध युद्ध करताना आपली शस्त्रे परजवून ठेवण्याची हीच वेळ आहे.