Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशातल्या ७५ हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करणार

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना औषधी ७,५०० वनस्पतींचे वाटप

September 5, 2021
in featured, आरोग्य, चांगल्या बातम्या
0
plants

मुक्तपीठ टीम

आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून देशात औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अभियान हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच हरित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी याची मदत होणार आहे. या अभियाना अंतर्गत येत्या एक वर्षात देशभरात ७५,००० हेक्टर जमिनीवर वनौषधींची लागवड केली जाणार आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि उत्तरप्रदेशातल्या सहारणपूर इथे या कार्यक्रमाची सुरवात झाली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या मालिकेतला हा दुसरा कार्यक्रम आहे.

plants

पुण्यामधल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले. आधीपासूनच वनौषधीची लागवड करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरचे आमदार निलेश लंके, युनानी औषध केंद्रीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ असीम अली खान, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ चंद्र शेखर संवल हे या कार्यक्रमांना खास उपस्थित होते. देशात औषधी वनस्पतींच्या पुरवठ्याला यामुळे आणखी गती प्राप्त होणार असल्याचे डॉ चंद्रशेखर संवल यांनी सांगितले.

plants

 

शेतकऱ्यांना वनौषधींचे वाटप

  • शेतकऱ्यांना 7,500 वनौषधीचे वाटप करण्यात आले.
  • औषधी वनस्पती आणि त्यांची लागवड या क्षेत्रात देशाची अपार क्षमता आहे.
  • 75 हजार हेक्टरवर अशा वनस्पतींची लागवड केल्याने देशात या औषधांची उपलब्धता सुनिश्चित होईल.
  • वनौषधी लागवड हा शेतकऱ्यांना उत्पनाचा मोठा स्त्रोत ठरणार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे.
  • यामुळे औषध क्षेत्रात देश स्वयंपूर्ण होईल.
  • गेल्या दीड वर्षात औषधी वनस्पतींची बाजारपेठ केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे.
  • यामुळेच अश्वगंधा हे अमेरिकेतले सर्वात जास्त विक्रीचे तिसरे उत्पादन ठरले आहे, असे ते म्हणाले.

plants


Tags: farmersmuktpeethpuneआयुष मंत्रालयऔषधी वनस्पतीमुक्तपीठशेतकरी
Previous Post

राज्यात ४,१३० नवे रुग्ण! २४ तासात विदर्भ, पुणे शहरासह २१ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही!

Next Post

उत्तर भारतीय बांधवांची आपल्या कोकणातील बहिणींना रक्षाबंधनाची भेट!

Next Post
kokan

उत्तर भारतीय बांधवांची आपल्या कोकणातील बहिणींना रक्षाबंधनाची भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!