मुक्तपीठ टीम
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये सिनियर मेडिकल ऑफिसर, असिस्टंट राजभाषा ऑफिसर, ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), ज्युनियर इंजिनीअर (मेकॅनिकल), सिनियर अकाउंटंट या पदांवर एकूण १७३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) एमबीबीएस २) २ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) ३ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा
४) पद क्र.४- ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
५) पद क्र.५- ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
६) पद क्र.६- इंटरमीडिएट सीए किंवा सीएमए असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.nhpcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.