Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मच्छिमारांना कोट्यधीश बनवणारे घोळ मासे, पोटातील ’भोत’ला का एवढी किंमत?

September 3, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
sea gold

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मुरब्यांचे मच्छिमार चंद्रकांत तरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घोळ माशांमुळे मोठा फायदा झाला आहे. खोल समुद्रात मच्छिमारी करताना त्यांना जाळ्यात १५७ घोळ मासे सापडले. लिलावात ते मासे १ कोटी ३३ लाख रुपयांना विकले गेले. चंद्रकांत आणि त्यांचा मुलगा सोमनाथ ७ मच्छिमारांसह २० ते २५ नॉटिकल मैल समुद्रात वाधावनच्या दिशेने हरबा देवी नावाच्या बोटीने गेले होते. यावेळी १५७ घोळ मासे समुद्रात पसरलेल्या जाळ्यात सापडले. बोटीवरील लोकांमध्ये आनंदाची लाट उसळली, कारण या मच्छिमारीमुळे त्यांना प्रचंड फायदा झाला.

 

उत्तरेतील व्यापाऱ्यांकडून भोताला मागणी

  • घोळ माशांचे वैज्ञानिक नाव ‘प्रोटोनिबीया डायकॅन्थस’ आहे. याला ‘सी गोल्ड’ असेही म्हणतात.
  • नर घोळ माशातील भोताला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी असते.
  • त्या तुलनेत मादी जातीच्या घोळ माशाच्या भोतला अगदीच नगण्य किंमत मिळते.
  • उत्तर प्रदेश,बिहार येथून आलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून घोळ माशांच्या भोताची खरेदी केली जाते.
  • लिलावाद्वारे घोळ माशाच्या भोताची खरेदी केली जाते.
  • सर्वात जास्त बोली लावणारा आणि पैश्याची हमी देणाऱ्या व्यापाऱ्याची निवड विक्री दरम्यान केली जाते.

 

दुसऱ्या लिलावात चांगली किंमत

  • सातपाटीमध्ये सर्व प्रथम शुक्रवारी भोताचा लिलाव एका व्यापाऱ्याच्या कमी किमतीच्या बोलीने अयशस्वी झाली.
  • रविवारी मुरबे येथे १५ ते २० व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव पार पडला.
  • तेथे एक कोटी २५ लाखाची उच्चतम बोली लागल्याची माहिती पुढे आली.
  • तर घोळ माशाचे मास ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दराने स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचे कळते.

 

भोताचा सौंदर्यापासून शस्त्रक्रियेपर्यंत उपयोगी

  • भोत खरेदी केल्यानंतर खूपच नाजूकरीत्या ते स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते.
  • खूपच लक्षपूर्वक प्रत्येक भोताची काळजी घेतली जाते.
  • भोतामधील रक्तपेशी वेगळ्या करून एका बंद खोलीत मोठ्या काचेच्या बल्बच्या प्रकाशात सुकवल्या जातात.
  • हॉंगकाँग, मलेशिया, थायलंड आदी देशात ह्या भोताला मोठी किंमत मिळते.
  • सौंदर्यप्रसाधने, औषधे, शस्त्रक्रिया दरम्यान लागणारे वितळणारे धागे बनवणे आदी साठी ह्याचा वापर करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: घोळ मासाथायलँडभोत खरेदीमलेशियासी गोल्डहॉंगकाँग
Previous Post

अनुष्का शर्माचं तरी ऐका…मास्क नक्की घाला…कोरोना संसर्ग रोखा!

Next Post

देशात ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत मोठी वाढ, मारुती, ह्युंडाई, टाटा सर्वांचा फायदा!

Next Post
Car

देशात ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत मोठी वाढ, मारुती, ह्युंडाई, टाटा सर्वांचा फायदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!