अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की, मराठी माणसाच्या मन- मनात उत्साह संचारतो. घरोघरी तयारीची लगबग सुरू होते. गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल तरी गणरायाची मूर्ती घडविणारे मूर्तिकार हिंमत न हरता आपली मूर्ती सेवा सुरू ठेवत आहेत. अंधेरीच्या सरुटा पाड्यातील गावदेवी कला केंद्राच्या श्रेयस मनोज चव्हाण आणि सहकार्यांशी मुक्तपीठने संवाद साधला.
आता कोरोनाचा काळ सुद्धा चालू आहे आणि आता गणपतीचा आगमन सुद्धा काही दिवसांवरच आले आहे तर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय, त्यावर श्रेयस मनोज चव्हाण म्हणाले, “माझ्या मते तर जे आमचे ग्राहक आहेत त्यांनी दोन महिने आधीच बुकिंग सुरु केले होते. तुम्ही बघू शकता की पहिल्यापासूनच बुकिंग चालू झालेली आहे आणि अजूनही ग्राहक येत आहेत. मूर्ती पसंत करतात. बुकिंग आजही सुद्धा सुरु आहे. ज्या प्रकारे आम्ही जे करतोय त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमची जी टीम आहे ती तरुण पिढीची टीम आहे.
चव्हाण यांचे दुसरे सहकारी सोनू शिंदे आणि मनिष पार्टे यांनीही त्यांच्या कलेची माहिती दिली.
सोनू शिंदे मूर्तीच्या डोळ्यांची आखणी करतात. तसेच ते मूर्तीवरील बारीक कलाकुसर कौशल्याने करतात. ते म्हणाले की आखणीचे काम करताना कमीत कमी दहा मिनिटे लागतात. एका मूर्तीमागे आखणी काम करत असताना मूर्तीची नजर आपल्याकडेच आहे, असं पाहणाऱ्याला वाटले पाहिजे. सरळ आखणी काम केल्यानंतर मग सोंड आणि बाकी सगळी कामे केली जातात. आम्ही आमचा प्रयत्न करत असतो की जेवढे बेस्ट काम देता येईल तेवढे आम्ही करतो. जास्त करून गणेश भक्त हे आखणी काम बघत असतात. त्यांना बाप्पाचे डोळे खरे जिवंत वाटणारे डोळे हवे असतात. म्हणून बेस्ट काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
मनोज चव्हाण यांचा दुसरा सहकारी मनिष पार्टे सोनेरी रंगकाम करतो. तो म्हणाला, लोकांना बाप्पाचे सोनेरी मुकूट, अलंकार भावतात. पण गोल्डन काम करताना वॉर्निश सांभाळून मारावा लागतो. मूर्तीचा वॉर्निश हा मेन आहे. त्यावरच गोल्डन उठून दिसतो. गोल्डनसुद्धा मारताना मूर्तीला इकडेतिकडे लागले तर मूर्तीचा चेहरा वेगळा होतो. म्हणून सांभाळूनच काम करावे लागते.
मुक्तपीठशी बोलताना या सर्व तरुण मूर्तिकारांचा उत्साह पाहून असे वाटते की गणपती बाप्पाचा उत्सव हा दणक्यात साजरा होणार आहे आपण सर्व ही आपल्या घरातच कोरोना नियम पाळूनच असाचं साजरा करूया गणपती बाप्पाचा उत्सव गणपती बाप्पा मोरया!
अंधेरी पश्चिम परिसरात ज्यांना गणती बाप्पाची मृर्ती विकत घ्यायची आहे, त्यांनी गावदेवी कला केंद्राशी संपर्क साधावा.
श्रेयस मनोज चव्हाण
९७६९६६३३३७