Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चेक पेमेंट सुरक्षित करणारी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’! समजून घ्या कशी असते ती…

आजपासून अॅक्सिस बँकेत बदलणार चेक पेमेंटचे नियम

September 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Axis bank

मुक्तपीठ टीम

भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयचे कडक नियम असूनही बँकांमध्ये फसवणूक होते. फसवणूक करणारे सामान्य लोकांना लुटण्यासाठी काही ना काही मार्ग शोधतात. वाढती फसवणूक लक्षात घेऊन अॅक्सिस बँक ग्राहकांना चेक पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. अॅक्सिस बँक उद्यापासून पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरू करत आहे. त्यामुळे आयसीआयसीआय, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आणि अॅक्सिसनंतर आता इतरही बँका ही सुरक्षा सुविधा सुरु करू शकतात. त्यामुळे प्रत्येक बँक खातेदाराने पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे काय ते समजून घेणे आवश्यक आहे.

पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे काय आहे?

  • पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत चेक देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चेकचा तपशील त्याच्या बँकेकडे पाठवावा लागेल.
  • या सिस्टमद्वारे, ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे चेक पुन्हा कन्फर्म करावे लागतील.
  • चेक देणाऱ्या व्यक्तीला चेकची तारीख, लाभार्थीचे नाव, प्राप्तकर्ता आणि देय रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही कळवावी लागेल.

‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ किती मर्यादा? कसं काम करते?

  • पॉझिटिव्ह पे सिस्टम ५० हजार किंवा अधिकच्या बँक चेकद्वारे पेमेंटसाठी लागू आहे.
  • बँकेच्या ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत चेक तपशीलांची पुष्टी करावी लागेल, जेव्हा ते ५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे बँक चेक जारी करेल.
  • या सिस्टमद्वारे एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेकची माहिती देता येते.
  • चेकचे पेमेंट करण्यापूर्वी हे तपशील पुन्हा पडताळले जातील.
  • चेक ट्रंकेशन सिस्टम अंतर्गत चेक क्लियर करताना फसवणुकीपासून संरक्षण प्रदान करते.
  • ही चेक गोळा करण्याची प्रक्रिया जलद करते.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा चेक पेमेंट सुरक्षेसाठी निर्णय

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने चेकवर आधारित व्यवहारांची सुविधा सुरक्षित करण्यासाठी १ जानेवारी २०२१ पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
  • आयसीआयसीआय बँक २०१६ पासून आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित १ जानेवारी २०२१ पासून नवीन पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरू केली होती.
  • बँक ऑफ बडोदामध्येही ही सिस्टम लागू आहे.
  • आता अॅक्सिस बँकेनंतर इतरही बँका पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे.

Tags: Axis bankCheque paymentsICICI bankpositive pay systemReserve Bank of Indiaआयसीआयसीआयचेक पेमेंट नियमपॉझिटिव्ह पे सिस्टमबँक ऑफ बडोदास्टेट बँक
Previous Post

“अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा”: दादाजी भुसे

Next Post

नेव्हल एव्हिएशनला मिळणार ‘प्रेसिडेंट कलर’ सर्वोच्च सन्मान! समजून घ्या नेव्हल एव्हिएशन…

Next Post
naval aviation

नेव्हल एव्हिएशनला मिळणार ‘प्रेसिडेंट कलर’ सर्वोच्च सन्मान! समजून घ्या नेव्हल एव्हिएशन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!