मुक्तपीठ टीम
आता भारतीयांना आरोग्याविषयी अचूक माहिती घेण्यासाठी एक चांगलं अॅप उपलब्ध झाले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांनी नुकताच ‘फिट इंडिया मोबाईल अॅप’ लाँच केले आहे. फिट इंडिया कार्यक्रमाला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर या अॅपचे लॉंच मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर करण्यात आले.
क्रीडा मंत्र्यांची फिटनेस प्रात्यक्षिकं
- केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या वेळी आरोग्याशी निगडीत दोरीवर उडी मारण्याचे कौशल्य दाखवले.
- ते बराच वेळ दोरीवर उडी मारत होते.
- या कार्यक्रमात उपस्थित लोकांनी क्रीडामंत्र्यांच्या प्रोत्साहनाबद्दल टाळ्या वाजवून कौतुक केले.
- अनुराग ठाकूर म्हणाले की, “हे एक मोफत मोबाइल अॅप्लिकेशन आहे जे फिटनेसवर आधारित माहिती देण्यास मदत करेल.”
- ‘फिटनेसचे डोस, अर्धा तास रोज’ असे या योजनेचे एक घोष वाक्य देखील आहे.
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह, कुस्तीपटू संग्राम सिंह, क्रीडा पत्रकार अयाज मेमन आणि एअर इंडियाची कॅप्टन एनी दिव्या हे सर्व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अॅप लाँचिंग संस्मरणीय बनवण्यासाठी उपस्थित होते.
फिट इंडिया मोहिमेची दोन वर्षे
- हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस पोर्टलवरही उपलब्ध असेल.
- हे सामान्य स्मार्टफोनवर देखील काम करू शकते, हे लक्षात घेऊन विकसित केले गेले आहे.
- वर्ष २०१९ मध्ये पंतप्रधानांनी फिट इंडिया मोहिमेची सुरुवात केली.
- गेल्या दोन वर्षांमध्ये फिट इंडिया स्कूल वीक, फिट इंडिया फ्रीडम रन, फिट इंडिया सायकलथॉन आणि इतर विविध फिटनेस मोहिमांद्वारे ही मोहीम लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे.