मुक्तपीठ टीम
विज्ञान क्षेत्रातले भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी आता नवोन्मेशी अर्थव्यवस्थेशी जोडली जाऊ लागली आहे. वैज्ञानिक संशोधनविषयक प्रकाशनात देशाने तिसरे स्थान प्राप्त केले आहे, आता जागतिक नवोन्मेश निर्देशांकानुसार जागतिक स्तरावरच्या नवोन्मेशी अर्थव्यवस्थांमध्ये पहिल्या ५० मधेही भारताने स्थान प्राप्त केले आहे. अनेक विकसित आणि विकसनशील देशानाही भारताने मागे टाकले आहे.
संशोधन आणि विकास क्षेत्रात भारताच्या राष्ट्रीय गुंतवणुकीत २०१७-१८ मधल्या १,१३,८२५.०३ कोटी रुपयांवरून वाढ होऊन २०१८-१९ मध्ये ती १,२३,८४७.७१ कोटी रुपये झाली. त्याच बरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या निधी सारख्या उपक्रमांनीही हे स्थान प्राप्त करण्यात महत्वाची भूमिका बजावली. निधीच्या अंमलबजावणीमुळे ३६८१ स्टार्ट अपची जोपासना झाली यातून १९९२ बौद्धिक संपदेची निर्मिती झाली. या माध्यमातून गेल्या पाच वर्षात थेट रोजगाराच्या स्वरुपात ६५,८६४ रोजगाराची आणि २७,२६२ कोटी रुपयांच्या आर्थिक संपदेची निर्मिती झाली.
कल्पनांचे वापरायोग्य तंत्रज्ञानात रुपांतर आणि त्याचा देशभरात मोठ्या प्रमाणात उपयोग करण्याच्या चळवळीचा देशभर प्रसार सुरु झाला आहे. २०१७-१८ या वर्षात १३,०४५ पेटंटना मंजुरी देण्यात आली त्यात १,९३७ भारतीय पेटंटचा समावेश होता. २०१७-१८ या वर्षात भारतीय पेटंट कार्यालयात दाखल झालेल्या पेटंट मध्ये काही राज्यांचा सिंहाचा वाटा होता. दाखल ६५% पेटंट महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांमधली होती.
गेल्या १० वर्षात विज्ञान संशोधनविषयक प्रकाशनात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या एजन्सीच्या आकडेवारी नुसार भारताचे नॅशनल सायन्स फौंडेशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये १,३५,७८८ वैज्ञानिक लेख प्रकाशित करण्यात आले. वैज्ञानिक प्रकाशनात भारतात १२.९ वाढ झाली आहे तर जागतिक सरासरी ४.९ आहे. भारतात २००८ ते २०१८ या काळात प्रकाशन वार्षिक वृद्धी दर १०.७३ टक्के असा सर्वात वेगवान दर राहिला.