मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेल्या अटकेवरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. जर प्रत्येकाने आपलं भान ठेवून वक्तव्ये केली असती तर ही वेळ आली नसती असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
प्रत्येकाने भान ठेवून वक्तव्य केली पाहिजेत
- ‘मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोणावरही टीका करताना भान ठेवून बोलले पाहिजे.पक्ष वाढविण्यासाठी यात्रा काढत असताना भान ठेऊन तुम्ही वक्तव्य केली असती तर ही वेळ आली नसती.
- पदावर असताना जबाबदार वक्तव्य करणे महत्त्वाचे आहे.
- इतरांनीही मागे काही वक्तव्ये केली पण तेव्हा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली नव्हती.
- हे लक्षात घेण्याची गरज आहे.
- ‘प्रत्येकाने भान ठेवून वक्तव्य केली पाहिजेत’
- तसंच ‘प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते
- त्यानंतर वरुन आदेश मिळाले की जावा फिरा.
- आता वरुन आदेश मिळालेत म्हणल्यावर फिरणं भागच आहे वरिष्ठांनी सांगितल्यानंतर.
- वास्तविक सोशल मीडियावर लोक काय प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत ते पाहा.
- कारण, नसताना वेगळं, प्रत्येकाने भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते ना.
- इतरांनीही मागे काही वक्तव्य केली पण तेव्हा त्यांनी शपथ घेतली नव्हती.
- मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एक जबाबदार व्यक्ती म्हणून बोललं पाहिजे.
- परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पावलं उचलावी लागतात.
- निर्णय घ्यावे लागतात.
- लोकांना, सगळ्यांना न्याय द्यावा लागतो.