मुक्तपीठ टीम
अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर तालिबानचीच सत्ता असेल असे मानले जात होते, पण २६ ऑगस्ट रोजी काबूलमध्ये झालेल्या हल्ल्याने तसं मानणं योग्य नसल्याचं उघड झालं आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट अफगाणिस्तान आणि पाकिस्तान शाखा इसिस-खोरासान म्हणजेच ‘इसिस-के’ यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे तालिबानसारखी इस्लामी कट्टरतावादी राजवट असूनही ‘इसिस-के’ एवढा भीषण हिंसाचार का घडवत आहे, असा प्रश्न समोर आला आहे. दोन इस्लामी कट्टरपंथीयांमधील रक्तरंजित संघर्षामागील कारणं समजून घेणे आवश्यक आहे.
या हल्ल्यानंतर तज्ज्ञ सांगत आहेत की अल कायदा आणि इसिस-के सारख्या दहशतवादी संघटनांशी युद्ध आणखी वाढू शकते. या गटांमध्ये पिढीजात आणि सैद्धांतिक विभागणी आहे. अलिकडच्या वर्षांत इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला आहे कारण इराक आणि सीरियामध्ये काही दिवसांच्या अतिरेकी संघांची स्थापना करण्यात यश आले आहे.
‘इसिस-के’ तालिबानला कमकुवत करेल का?
- अफगाणिस्तानातून अमेरिका बाहेर पडल्यामुळे आता ‘इसिस-के’ आपला स्थानिक स्पर्धक तालिबानला कमकुवत करण्यावर लक्ष केंद्रित करू शकते.
- ‘इसिस-के’चे लक्ष्य सध्या अफगाणिस्तानात राजकीयदृष्ट्या सत्ता स्थापना प्रक्रियेत दखलपात्र राहणे हे असू शकते.
- ‘इसिस-के’ तालिबानची सत्ता अफगाणिस्तानात स्थिर होण्यापासून रोखण्यासाठी वाट्टेल ते करू शकते.
त्यामुळे ‘इसिस-के’ तालीबानची विश्वासार्हता कमी करण्यासाठी घातपातावर भर देत राहू शकते. - अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांनी काबूल विमानतळाजवळ हल्ल्याचा इशारा दिला होता.
- लोकांना विमानतळापासून दूर राहण्यास सांगितले होते.
- ही गुप्तचर माहिती मिळाल्यानंतरही ‘इसिस-के’ काबूल विमानतळावर हल्ला करण्यात यशस्वी ठरले आहे.
तालिबानला कमकुवत ठरवण्यासाठी ‘इसिस-के’चा हिंसाचार?
- वॉशिंग्टन पोस्टने असे वृत्त दिले आहे की तालिबानने काबूल ताब्यात घेण्यापूर्वीच अमेरिकेचे सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तानमध्ये ‘इसिस-के’ च्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंतित होते.
- ‘इसिस-के’ ने राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत हिंसाचार वाढवल्या अशाही बातम्या होत्या.
- एका अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकन सैनिक आणि तालिबान दोघेही हल्ल्याचे लक्ष्य होते.
- या हल्ल्यात सामान्य लोकांबरोबरच अमेरिकन सैनिक आणि अनेक तालिबान लढाऊही मारले गेले आहेत.
- संयुक्त राष्ट्र संघाचा असा अंदाज आहे की अफगाणिस्तानच्या कोनार आणि नानहार प्रांतांमध्ये १५००-२००० ‘इसिस-के’ लढाऊंचा मुख्य गट आहे.
- २०२१ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ४७ हल्ले झाले.
- २०१७ मध्ये या गटाने १०० हल्ल्यांची आणि २०१८ मध्ये ८४ हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली.
तालिबान दोन आघाड्यांवर कसे लढणार?
- काबूल हल्ल्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की या हल्ल्याने तालिबान कमकुवत असल्याचे सिद्ध झाले आहे.
- असे आणखी हल्ले तालिबानला कमकुवत करत राहतील.
- ‘इसिस-के’ला चांगलेच माहीत आहे की तालिबान दोन आघाड्यांवर युद्ध लढण्याच्या स्थितीत नाही.
- ‘इसिस-के’ आपला प्रभाव वाढवण्यासाठी तालिबान आणि अमेरिका यांच्यातील संवादच संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
तालिबान काय करणार?
- तालिबान आयएसआयएस-के सेनानींना त्यांच्या गटात पुन्हा सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- तालिबानसाठी हे अत्यंत कठीण ठरू शकते.
- अशा परिस्थितीत, येत्या काळात तालिबान आणि ‘इसिस-के’ मध्ये भीषण युद्ध घडण्याची भीती आहे.