मुक्तपीठ टीम
जर तुम्ही नवीन ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. तुम्ही नवा स्मार्ट फोन खरेदी करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 5G टेक्नॉलॉजी आता खूपच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे. म्हणून नवीन ५ जी स्मार्टफोन खरेदी करतेवेळी खास काळजी घ्या. नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी पुढील मुद्द्यांवर नक्की विचार करा.
तुलना करून वेग तपासा
- आताच्या काळात ४ जी तुलनेत ५ जी स्मार्टफोची किंमत जास्त आहे.
- ५ जी खरेदी करताना तो ४जी च्या तुलनेत फास्ट आहे की नाही, हे तपासा.
- ५जी ची किंमत ४जी च्या तुलनेत दुप्पट आहे.
- तसंच ५जी नेटवर्क वापरण्यासाठी महाग रिचार्जची गरज आहे.
- त्यामुळे ५जी खरेदी करताना याचा विचार करा.
फोन किती बँडवर चालणार?
- भारतामध्ये ५जी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे.
- भारतामध्ये ५ जी नेटवर्क रोलआऊट होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो, हे स्मार्टफोन कंपन्यांना चांगलंच माहित आहे.
- काही कंपन्या सिंगल बँडवाले ५जी स्मार्टफोन आणतायत, जे भविष्यातील टेक्नॉलॉजीसाठी सक्षम नसू शकतात.
फोनची फ्रिक्वेंसी नक्की तपासा!
- भारतात सध्या ५जी नेटवर्क उपलब्ध नाही.
- त्यामुळे रेडियो फ्रिक्वेंसीवाले ५जी स्मार्टफोन खरेदी करु नका.
- सब-६ जीएचझेड ५जी फ्रिक्वेंसीवाले स्मार्टफोन खरेदी करणे जास्त चांगलं होईल.
- नेटवर्कमध्ये जास्त कवरेज एरिया मिळतो.
- फ्लॅगशिपफोनसारखे सॅमसंग गॅलेक्सी एस१० ५जी सब-६ जीएचझेड ५जीला सपोर्ट करत नाही.
बॅटरी लाईफ किती?
- ५जी स्मार्टफोनमध्ये ४जी च्या तुलनेत जास्त गरण होण्याची समस्या आहे.
- बॅटरीही लवकर संपते, अशा तक्रारी आहेत.
- नवीन ५जी फोन खरेदी करताना फोनच्या बॅटरी लाईफबद्दल जरूर माहिती घ्या.
- ५जी टेक्नोलॉजीमध्ये डेटा रिसिविंग करताना जास्त बॅटरी खर्च होते. जास्त बॅटरीवाले ५ जी स्मार्टफोनला खरेदी करणं चांगला ऑप्शन आहे.
सपोर्ट प्रोसेसर
एक चांगल्या ५ जी स्मार्टफोनसाठी चांगल्या प्रोसेसरची गरज सुद्धा असते. अशामध्ये नवीन ५ जी स्मार्टफोन खरेदी करताना लक्ष दिले पाहिजे की जो स्मार्टफोन घेणार आहोत तो डेडिकेटेड ५जी प्रोसेसर सपोर्टसोबत येतो किंवा नाही. ग्राहकांनी ५जी प्रोसेसर सपोर्टवाल्या स्मार्टफोन खरेदीला पसंती दिली पाहिजे.