मुक्तपीठ टीम
सत्तेचा कितीही दुरुपयोग करा परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे.
भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना धमक्या दिल्या असून याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे.
भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा ही काय नवीन गोष्ट नाही असेही नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे.