मुक्तपीठ टीम
काही गणेशोत्सव मंडळांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली त्याच पद्धतीने दहीहंडी उत्सवाची परंपरा अखंड रहावी म्हणून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, असे भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.
लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी द्यावी. कोरोनाची परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत. त्यांना गर्दी न करता आप-आपल्याला विभागात पारंपरिक पध्दतीने कमी उंचीच्या दहीहंडी ला परवानगी शासनाने द्यावी. उत्सवावर पुर्णपणे बंदी असू नये.
उत्सवांची परंपरा कायम राहिल अशी भूमिका शासनाने घ्यावी, असे आमदार अॅड आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आज याबाबत बैठक व्हावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती. मात्र सोलापूर दौऱ्याच्या प्रवासात असल्याने त्याना बैठकीत सहभागी होता आले नाही.