मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्रीपदाचा वापर करून उत्तर महाराष्ट्रात आरोग्य सुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. धुळे येथे जन आशीर्वाद यात्रेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ.पवार म्हणाल्या की,कोरोना काळात केंद्र सरकारने राज्यांना मदतीचा हात दिला, लसीचे उत्पादन करून मोफत डोस दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक मदत या काळात झाली. परंतु महाविकास आघाडी सरकारने या काळात जनतेला मदत देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद न करता केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला.
या वेळी व्यासपीठावर माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी पर्यटन मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, यात्रा संयोजक आ.डॉ अशोक उईके, यात्रा सहसंयोजक किशोर काळकर,आ. राजेश पाडवी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, काळकर, आ. अमरीश पटेल, आ. काशीनाथ पावरा, लक्ष्मण सावजी, धुळे ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर भगवान गवळी, माजी महापौर जयश्री अहिरराव, स्थायी समिती अध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित होते.
धुळे शहरात जन आशीर्वाद यात्रेचे ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.