मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते खासदार संजय राऊतांचे आजचे रोखठोक भाजपा नेत्यांना चांगलेच निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आज त्यांच्या रोखठोक सदरामधून मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यावर शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “सामनाने आता नाव बदलून टाकावं, सामनाने त्याचं नाव पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावं.” असं शेलार म्हणाले आहेत.
आशिष शेलारांचा राऊतांशी सामना
- संजय राऊतांचा या देशाचा वेगळा इतिहास लिहिण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना त्यांनी बळ देण्याचा हा प्रयत्न आहे.
- जीना यांनी फाळणी केली याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही.
- गोळीबार, हल्ला किंवा गाधीजींची हत्या याचं कुणी समर्थन करण्याचा विषयच नाही.
- संजय राऊत, विपर्यासाचं विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही.
- भारतीय लोकांच्या फाळणीच्या आठवणींना एक अर्थाने इतिहासातून धडा घेऊन, नवा इतिहास घडवण्यासाठीचा तो दिवस पंतप्रधान मोदींनी घोषित केला आहे.
- त्यामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागलं आणि जे पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागलं. त्याच पद्धतीच्या भावना संजय राऊतरुपी संपादकाच्या हातून सामनात उतरायला लागल्या.
- त्यामुळे सामनाने आता नाव बदलून टाकावं, सामनाने त्याचं नाव पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावं.