Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परतावा फसवणुकीचे मोठे प्रकरण, ११८ कोटीचा घोटाळा उघडकीस!

जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाकडून संतोष दोशीला अटक

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
dcgi

मुक्तपीठ टीम

वस्तू आणि सेवाकर गुप्तवार्ता महासंचालनालय, सीबीआयसी, डीजीजीआय-एमझेडयूच्या मुंबई विभागाने इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) परतावा फसवणुकीचे एक मोठे प्रकरण उघडकीला आणले असून संतोष दोशीला अटक केली आहे. संतोष दोशी अमल ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड, सी-क्लस्टर एक्स्पोट्रेड प्रा. लि., एकॉन क्रिस्टलमर्चंट्स प्रा. लि., मेटीक्युलस ओव्हरसीज प्रा. लि., निनाद ओव्हरसीज प्रा. लि., परीस ओव्हरसीज प्रा. लि., व्हाईट ओपल एक्स्पोट्रेड प्रा. लि. या सात कंपन्या नियंत्रित आणि परिचालन करत होता. त्याने कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता बनावट इनव्हॉइसच्या जोरावर फसवून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले आणि निर्यातीवरील परतावा म्हणून ११८ कोटी रुपयांचा दावा केला होता.

 

आर्थिक फसवणुकीची मोडस ऑपरेंडी

  • या आर्थिक फसवणूकीची पद्धती अशी होती की बनावट कागदपत्रांच्या आधारे झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अनेक डमी युनिट्स तयार करण्यात आली.
  • त्यांनी छत्तीसगडमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या अनेक शेल कंपन्यांना बनावट आयटीसी दिला.
  • तसेच महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे निर्यात करण्यासाठी अनेक युनिट्स तयार करण्यात आली, ज्यांना छत्तीसगड मधील कारखान्यांनी निर्यात करण्यासाठी कथित बनावट माल पाठवला.
  • निर्यात युनिट्स केवळ फसव्या पद्धतीने परतावा मिळवण्याच्या हेतूने तयार केली होती.

 

आर्थिक फसवणुकीच्या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी, जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालय, मुंबईने संबंधित सीएचए, सीए, सीएस, प्रमुख व्यक्ती आणि मालवाहतूक फॉरवर्डर्स यांचा शोध घेतला आणि अनेक जबाब नोंदवले. तपासात हे उघड झाले की, महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी संतोष दोशी, जो मेसर्स मासुमी ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक आहे, तो प्रत्यक्षात या सात निर्यातदार कंपन्यांचा प्रवर्तक आणि ऑपरेटर होता. त्याने आयटीसी रोख स्वरूपात मिळवण्यासाठी उत्पादकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि निर्यातदारांपर्यंत विविध व्यवहारांचा वापर करून एक जाळे तयार केले.

 

संतोष दोशीला १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आणि त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याला २०१६ मध्येही मुंबई सीमाशुल्क विभागाने अटक केली होती.
याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


Tags: DGGISantosh Doshiइनपुट टॅक्स क्रेडिटडीजीजीआयसंतोष दोशीसीबीआयसी
Previous Post

“गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर तो प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती!”

Next Post

नवी मुंबईत कोंकण रेल्वेत १४ जागांसाठी भरती

Next Post
कोंकण रेल्वे

नवी मुंबईत कोंकण रेल्वेत १४ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!