मुक्तपीठ टीम
भाजपा आयोजुत केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी गुरुवारी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेटीनंतर शिवसैनिकांनी गोमुत्रानं शुद्धिकरण केलं. त्यानंतर नारायण राणे यांनी याविषयी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. “सध्या पत्रकार देशातील इतर प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारत आहेत. ह्या एकाच विषयासाठी आलो आहोत का?” असं पत्रकारांना सुनावतानाच त्यांनी शिवसैनिकांनाही सुनावले, “मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण स्मारकाकडे पँट वर करून जावं लागतं. गोमूत्र शिंपडा, प्या. पण स्मारकाकडेही पाहा!”
पत्रकारांनी देशाच्या प्रश्नांवरही विचारावं!
- मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळं स्थान आहे.
- मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही.
- पत्रकारांचं मार्गदर्शन आम्हालाही मिळावे.
- तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र, सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारत आहेत. या एकाच विषयासाठी आलो आहोत का?
गोमूत्रं शिंपडा, नाही तर प्या!
- गोमूत्र आणि गोमूत्रं यासाठी आलो का?
- मला कुणासमोर नतमस्तक व्हावं असं वाटतं तो माझा प्रश्न आहे.
- इतरांचा हा प्रश्न नाही.
- ज्यांना गोमूत्र शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या.
- गोमूत्रं प्यायचं तर पिऊ द्या.
- हे स्मारकाचं काय सांगतात?
- ते स्मारक दलदलीत आहे. पँटवर करून तिथे जावं लागतं.
- राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तरीही ही अवस्था!
- जरा जागतिक दर्जाची स्मारकं पाहा. ती कशी आहेत ते बघा