मुक्तपीठ टीम
चित्रपट दिग्दर्शक निर्माता रोहित शेट्टी हे स्वातंत्र्यदिनानिमित्त एका विशेष उपक्रमासाठी जुहू पोलीस ठाण्यात पोहोचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत मानेंसह त्यांनी सायबर गुन्हेगारीविषयी उपस्थितांना माहिती दिली. खरंतर रोहित शेट्टी नेहमी चित्रपटांची किंवा खतरों के खिलाडीसारख्या मालिकांची निर्मिती करताना पाहायला दिसतात. जुहू पोलीस ठाण्यात ते एक सायबर मित्र म्हणून आले होते.
आपल्याला एखादा अनोळखी कॉल येतो, काहीजण ओटीपी मागतात, अशा वेळेस फ्रॉड होण्याची मोठी शक्यता असते. त्यावेळी घावरण्याची गरज नसते. जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर यांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. अशी माहिती रोहित शेट्टीने दिली. तो म्हणाला, “कोणतीही अडचण आल्यास जुहू पोलीस ठाण्यात तक्रार करा आपले सायबर फ्रेंड्स तुमची नक्की मदत करतील. असे केल्याने हा गुन्हा थांबू शकतो. घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही त्वरित येऊन तक्रार करू शकता.”
रोहित शेट्टी अनेक तरूणांसह येथे याबद्दलची माहिती देण्यासाठी पोहोचला होता. त्यांनी एक पोस्टरही तयार केलेले आहे. त्यामध्ये लिहीले आहे की, “आय अॅम सायबर फ्रेंड ऑफ जुहू पोलीस”. त्यांनी जुहूला राहणाऱ्या नागरिकांना या मोहिमेत सामील होण्यासाठी आवाहन केले.
पुढे रोहित शेट्टी म्हणाला की, जेवढे पण आपण जुहू या ठिकाणी राहणारे नागरिक आहोत, त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी या आमच्या गुन्हेगारीविरूद्धच्या मोहिमेत सहभाग घ्यावा. सायबर गुन्हा म्हणजे ज्यावेळी आपल्यासोबत बॅंकेचा पिनकोड घेऊन, ओटीपीद्वारे, किंवा फोनद्वारे फ्रॉड घडतो म्हणजेच गुन्हा घडतो हा सायबर गुन्हा असतो. अशा वेळेस २४ तासांआधी गुन्हा नोंदवणे हे खूप महत्त्वाचे आहे. आमची टीम तुमची या काळात मदत करेल, नुकसान होऊन देणार नाही. यासह तुमच्या सोबत गुन्हा घडू देणार नाही आणि गुन्हेगाराला पकडण्यास मदत करेल.”