मुक्तपीठ टीम
आपल्या ईशान्येतील राज्यांमधील एक मिरची ही जगातील सर्वात तिखट म्हणून ओळखली जाते. ती ईशान्येतील राज्यांमधील भूत झोलकिया मिरची. खाण्यासाठीच नाही तर बॉम्ब बनवण्यासाठीही तिचा वापर होतो. नागालँडमधील भूत झोलकियांपैकी ‘राजा मिर्च’ ची एक खेप नुकतीच लंडनला निर्यात करण्यात आली आहे.
भारत हा पूर्वीच्या काळी ओळखला गेला तो मसाल्यांसाठी. भारतीय खाद्य संस्कृतीत मिरच्यांचा वापर सढळ हातानं केला जातो. कधी लाल, कधी हिरवी तर कधी पिवळी. ईशान्य भारतातील एका मिरचीचे अनोखे नाव आहे भूत झोलकिया म्हणजेच घोस्ट पेपर. ही मिरची इतकी तिखट आहे की लोक अन्नामध्ये त्याचा वापर करण्यासाठीही घाबरतात. अपवाद ती पिकणाऱ्या ईशान्येकडील राज्यांचा. तेथे तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
भूत झोलकिया..जगातील सर्वात तिखट!
- या मिरचीची लागवड नागालँडमध्ये केली जाते.
- नागालँडला २००८ मध्ये या मिरचीसाठी जीआय टॅगही मिळाला आहे. आसाममधील तेजपूर आणि नागालँड, मणिपूर, मिझोरामचा परिसर भूत झोलोकियाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
- नागालँडमधील भूत झोलकियांपैकी ‘राजा मिर्च’ ची एक खेप लंडनला निर्यात करण्यात आली आहे.
- तेथिल खवैयांच्या पसंतीस उतरली तर तिची मोठ्या प्रमाणावर निर्यात होईल.
- तिची निर्यात नुकतीच लंडनला करण्यात आली आहे.
- पहिल्यांदाच ती इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी वापरली गेली आहे.
- हा प्रयोग यशस्वी झाला तर सरकारच्या मदतीनं ते अधिक वाढवण्यात येईल.
अत्यंत तिखट चवीमुळे पंतप्रधान मोदींनीही या मिरचीचे कौतुक केले होते. या मिरचीचे कौतुक करण्याबरोबरच त्यांनी तिच्या तिखटपणाबद्दल आश्चर्यही व्यक्त केले आहे. ही मिरची लंडनला निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने आता योग्य पावलं उचलली आहेत.
खरंतर ही मिरची नाहीच बॉम्ब आहे बॉम्ब!
- मिरची किती तिखट आहे, हे एकदा तिची किंचितही चव घेतलेलेही तेच सांगू शकतात.
- ही मिरची तिच्या तिखटपणामुळे जगभरात प्रसिद्ध होत आहे.
- या मिरचीची लागवड ईशान्य भारतात केली जाते.
- नागालँड सरकारला २००८ मध्ये या मिरचीसाठी जीआय टॅगही मिळाला आहे.
- आसाममधील तेजपूर आणि नागालँड, मणिपूर, मिझोरामचा परिसर भूत झोलोकियाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
- भूत झोलोकिया किंग चिली स्कोव्हिल हीट युनिट्सच्या आधारावर जगातील सर्वात तिखट मिरची मानली जाते.
- अति पावसात भूत झोलकियाचे पीक खराब होते, अगदी पाऊस नसला तरी ते सुकते.
- भूत झोलकियाचा आकार ६ ते ८ सें.मी. होतो.
- बऱ्याचदा ती पिकल्यावर लाल रंगाची असते, परंतु कधीकधी केशरी आणि चॉकलेटी रंगाचीही असते.
- या मिरचीचा वापर शस्त्र म्हणूनही केला जातो.
- चटणी आणि भाज्यांची चव वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.
मिरचीचा बॉम्बमध्येही वापर!
- २००९ मध्ये, डिफेन्स रिसर्च डिझाईन ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने भूत झोलकियाचा हँड ग्रेनेड वापरण्यावर संशोधन केले.
- तेजपूर येथील डीआरडीओच्या प्रयोगशाळेने मिरची ग्रेनेड किंवा मिरची बॉम्ब बनवला.
- त्याच वेळी, २०१६ मध्ये, पेलेट गनमध्ये त्याचा वापर करण्याच्या प्रस्तावावरही विचार करण्यात आला.