Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महात्मा गांधींना पर्यावरण वंदना, १५ हजार रोपांनी साकारले ‘ग्रीन गांधी’

August 16, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Environmental salute

मुक्तपीठ टीम

महात्मा गांधी. आपल्या देशाच्याच नाही तर जगाच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व. त्यांचे विचार आणि कर्तृत्व कोणत्याही मर्यादेत सामावू शकत नाहीत. गांधींजी देशासाठी, मानवतेसाठी केलेल्या कार्यामुळे जसे ओळखले जातात, तसेच निसर्गप्रेमासाठीही. त्यामुळेच ७५ व्या स्वातंत्र्यदिनी त्यांना मानवंदना देण्यासाठी एका रांगाळीकारानं हिरवाईनं घडवलेली ग्रीन गांधी कलाकृती सर्वात समर्पक ठरत आहेत.

 

गांधींजींची वेगळी कलाकृती

  • मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये हिरवाईनं कलात्मक इतिहास घडवला आहे.
  • आजवर राष्ट्रपिता महात्मा गांधींची चित्रं, शिल्पं अशा माध्यमातून घडवली नसेल अशी हरित कलाकृती तिथं घडवली गेली आहे.
  • जी पाहणाऱ्याला मोहित करते आणि भव्यतेने मनात ठसते.

 

हिरवाईनं घडली ग्रीन गांधी कलाकृती!

  • स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त, छिंदवाडातील केकेएफ म्हणजेच किर्तीश केअर फाउंडेशनने काही तरी वेगळं करायचं ठरवलं.
  • त्यातून ग्रीन गांधी कलाकृतीची कल्पना पुढे आली.
  • यासाठी विद्याभूमी शाळेच्या ११ हजार चौरस फूटांचे विशाल अंगण निवडण्यात आलं.
  • प्रसिद्ध रांगोळी कलाकार रजत गधेवाल यांनी ग्रीन गांधी तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली बारा कलाकारांच्या टीमने ९ ऑगस्टपासून काम सुरू केले.
  • अखेर पाच दिवस १५ हजार रोपांच्या मदतीने ग्रीन गांधींची कलाकृती साकारली.

 

ग्रीन गांधी कलाकृती आता लोकांसाठी खुली करण्यात आली आहे. १६ ऑगस्टपर्यंत लोक ही कलाकृती पाहू शकतात. ही प्रचंड कलाकृती बनवण्याचा उद्देश केवळ स्वातंत्र्याच्या महान नायकाचे ७५ व्या स्वातंत्र्यदिनी स्मरण करणे हा नाही, तर पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे देणे हाही आहे.

 

ही कलाकृती बनवण्यासाठी वापरल्या गेलेल्या १५ हजारांहून अधिक वनस्पती केकेएफ संस्थेच्या देखरेखीखाली १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान छिंदवाडा शहर आणि आसपासच्या परिसरात लावल्या जातील. त्यांची त्यांची संपूर्ण सुरक्षित देखभाल केली जाईल. हिरव्या वनस्पतींनी साकारलेली ही भव्य हरित कलाकृती जागतिक विक्रमांच्या यादीत नोंदवण्यासाठीही प्रयत्न केला जात आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: green gandhiMPग्रीन गांधी कलाकृतीमध्य प्रदेशमहात्मा गांधी
Previous Post

राज्यात नवे रुग्ण ५ हजाराखाली! पूर्व विदर्भ कोरोनापासून स्वातंत्र्याच्या दिशेने…६ जिल्ह्यांमध्ये ७ नवे रुग्ण!

Next Post

जगातील सर्वात तिखट मिरचीची भारतातून लंडनला निर्यात

Next Post
chilli

जगातील सर्वात तिखट मिरचीची भारतातून लंडनला निर्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!