Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंधन महागाईपासून स्वातंत्र्य! स्वातंत्र्यदिनी ओलाची ई-स्कूटर लाँच!

August 15, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
ola e scooter

मुक्तपीठ टीम

हा स्वातंत्र्य दिन इंधन महागाईच्या समस्येपासून स्वातंत्र्य मिळवून देणारा ठरु शकतो. ओलाची स्वातंत्र्य दिनी लाँच होत असलेली स्कूटर त्यामुळेच चर्तेत आली. अवघ्या २४ तासात एक लाख भारतीय ग्राहकांनी ही स्कूटर बूक केली. वेगळ्या फिचर्समुळे ओला ई-स्कुटर लाँचिंगच्या आधीपासूनच खूप चर्चेत आहे. या ई-स्कुटरमध्ये एक असं फिचर आहे जे बहुधा कोणत्याही टू व्हिलरमध्ये नसलेलं. ते आहे ओला ई-स्कूटर मागे घ्यायची असेल तर उगाच जोर लावावा लागणार नाही, त्यासाठी कारप्रमाणेच रिव्हर्स गिअर आहे.

ओलाची ई-स्कूटर…दणदणीत, खणखणीत!

• ओला ई-स्कूटर एका चार्जमध्ये १५० किमी पर्यंत धावते.
• स्कुटरचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे.
• स्कुटर फक्त १८ मिनिटांत ५० टक्के चार्ज होते.
• या इलेक्ट्रिक स्कूटरला स्मार्टफोनही जोडता येते.
• ई-स्कुटर चार्ज करणे ही समस्या मानली जाते, पण ओलाने त्यावरही मार्ग काढलाय.
• ओलातर्फे भारतातील ४०० शहरांमध्ये १ लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट बसवले जातील.

 

अॅपबेस कॅब सेवा पुरवणारी ‘ओला’ भारतातील आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या जबरदस्त लाँचिंगच्या तयारीत आहे. इंधन दरवाढीची नेहमीच्या टांगत्या तलवारीपासून स्वातंत्र्य मिळवून देणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर आज स्वातंत्र्यदिनी लॉन्च होईल.

बुकिंग अवघ्या ४९९ रुपयांत, २४ तासात एक लाख!

• ओला इलेक्ट्रिक स्कूटरबद्दलची उत्सुकता प्रचंड आहे.
• त्यामुळे बुकिंग सुरु करताच २४ तासात एक लाख स्कूटर बूक झाल्या आहेत.
• कंपनीने स्कूटरसाठी आगाऊ बुकिंग सुरू केली होती.
• ही बुकिंग ४९९ रुपयात करण्याची सोय होती.
• खास गोष्ट अशी आहे की, हे बुकिंगचे पैसे बुकिंग न झाल्यास परत ही दिले जातात.
• पहिल्या २४ तासात स्कूटरची १ लाखाहून अधिक बुकिंग होणे हे मोठे रेकॉर्ड आहे.

भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीची एक उत्तम सुरुवात आहे. आमच्यात सामील झालेल्या आणि स्कूटर बुक केलेल्या १ लाखाहून अधिक ग्राहकांचे आभार.”

ओलीची ई-स्कूटर…देखणी आणि हायटेक फिचर्स!

• ओला इलेक्ट्रिक स्कूटर निळा, काळा आणि गुलाबी या तीन कलर ऑप्शन्समध्ये येईल.
• कंपनीच्या टेस्ट ड्राइव्ह व्हिडीओमध्ये असे सांगितले गेले होते की, स्कूटरला त्याच्या विभागातील सर्वात मोठी बूट स्पेस आणि चार्जिंग रेंज मिळेल.
• तसेच ही स्कूटर स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह असेल.

हायस्पीड चार्जिंग मोठी रेंज!

• ही स्कूटर एकाच चार्जमध्ये १५० किमी पर्यंतची रेंज देईल.
• तसेच, केवळ १८ मिनिटांत ० ते ५०% पर्यंत चार्ज आकारले जाऊ शकते.
• स्कूटरला फुल-एलईडी लाइटिंग, वेगवान चार्जिंग, फ्रंट डिस्क ब्रेक अशी वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.
• याची टॉप स्पीड ९० किमी प्रतितास असू शकते. या स्कूटरची किंमत १ लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.


Tags: Independent DayIndiamuktpeethola electric scooterओला इलेक्ट्रिक स्कूटर
Previous Post

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात नायकांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

Next Post

भारतातील आणखी चार स्थळे आंतरराष्ट्रीय महत्वाची पाणथळ ठिकाणे म्हणून रामसर यादीत

Next Post
ramsar wetland

भारतातील आणखी चार स्थळे आंतरराष्ट्रीय महत्वाची पाणथळ ठिकाणे म्हणून रामसर यादीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!