Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भोकरमध्ये १९४ कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

January 21, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Ashok chavan

अजिंक्य घोंगडे

 

भोकर शहरातील व तालुक्यातील १९४ कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात ना. अशोकराव चव्हाण यांच्या रूपाने सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाल्याने तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लागत असून त्या कामाचा भूमिपूजन सोहळा  करण्यात येत आहे.

शुक्रवार, दि. २२ जानेवारी रोजी भोकर शहर व तालुक्यातील १९४ कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून सायंकाळी ४ वाजता भोकर येथील मोंढा मैदानावर जाहीर सभा व आभार सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,जि.प. कृषी पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे, जि. प. गटनेता प्रकाश भोसीकर, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, पं.स. सभापती निता रावलोड,कृउबा संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विविध विकास कामांचे भूमिपूजन

हादगाव ,तामसा, भोकर, उमरी, कारेगाव, लोहगाव, रस्त्याचे पेवर शोल्ड सह दुपदरीकरण करणे, भोकर मधील विश्रामग्रहाचे बांधकाम, मुदखेड भोकर रस्ता 161( अ) सुधारणा करणे, भोकर शहरासाठी वळण मार्गाचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, भोकर येथे १८०० मे. टन क्षमतेच्या नवीन शासकीय धान्य गोदामाचे बांधकाम, भोकर नगर परिषद विविध विकास योजनेअंतर्गत 14 कोटी ची कामे, अशा विविध विकासकामांचा शुभारंभ होणार असून सायंकाळी ४ वा. मोंढा मैदान भोकर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर ,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड.शिवाजी कदम, शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष  इनामदार,उपसभापती गणेश राठोड, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर ,साहेबराव सोमेवाड, गोविंद बाबागौड,शेख युसुफ,उपसभापती नागोराव कोटुळे यांनी केले आहे.

 


Tags: Ashok Chavanbhokarnandedअशोक चव्हाणनांदेडभोकर
Previous Post

“महाराष्ट्राच्या विकासासाठी पक्षभेद विसरून खासदारांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा”

Next Post

मुंबईच्या डोंगरीत ड्रग्जचा कारखाना, ‘डी कंपनी’चा परवेज खान मालक

Next Post

मुंबईच्या डोंगरीत ड्रग्जचा कारखाना, 'डी कंपनी'चा परवेज खान मालक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!