मुक्तपीठ टीम
आजकाल लोकांना डीएसएलआर कॅमेरापेक्षा स्मार्टफोनमध्ये फोटो काढायला जास्त आवडतं, कारण फोटो क्लिक करणं सोपं जातं आणि या डिवाईसमध्ये जबरदस्त कॅमेरा दिला जातो. काही वेळा यूजर्स फोनमध्ये फोटो क्लिक करतेवेळी काही गोष्टी लक्षात ठेवत नाहीत. त्यामुळे फोटो चांगले येत नाहीत. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, जे फोटो काढताना तुम्हाला उपयोगी पडतील.
झूमचा वापर कमी करा
जास्त तर लोक फोटो क्लिक करण्यासाठी झूमचा वापर करतात. मात्र यामुळे फोटो पिक्सल व्हायला सुरुवात होते. त्याने फोटो चांगला येत नाही. त्यामुळे बिना झूम करता फोटो काढण्याचा प्रयत्न करावा.
ग्रीड लाईनचा उपयोग करा
छान फोटो क्लिक करण्यासाठी तुम्ही ग्रीड लाईनचा उपयोग करू शकता. ग्रीड लाईनच्या मदतीने तुम्ही सोप्या पद्धतीने ऑब्जेक्टवर फोकस करू शकता आणि छान फोटो क्लिक करू शकता. या लाईनला ऍक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला ग्रीड लाईनचा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
पोट्रेट मोडचा वापर करू शकता
तुम्हाला जबरदस्त ब्लर बॅकग्राऊंड हवा असेल, तर तुम्ही पोर्ट्रेट मोडचा वापर करा. तुमच्या मोबाईलमध्ये पोट्रेट मोड असल्यास चांगले फोटो काढू शकता.
उजेडावर लक्ष ठेवणे गरजेचं आहे
स्मार्टफोनमधून फोटो काढताना उजेडावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. कमी उजेडामध्ये फोटो चांगला येत नाही. चांगला फोटो काढण्यासाठी ज्या दिशेने उजेड येतोय , त्या दिशेकडे पाठ करावी. सोबतच हे पण लक्षात ठेवावं की ऑब्जेक्टवर सुद्धा योग्य उजेड पडला पाहिजे.
फ्लॅश लाईटचा उपयोग कमी करावा
आजकाल सगळ्या स्मार्टफोनमध्ये फ्लॅश लाईट दिली जाते. पण गरजेचे नाही की प्रत्येक वेळा फोटो क्लिक करण्यासाठी याचा वापर केला जाईल. चांगल्या लाईटमध्येही मस्त फोटो क्लिक करू शकता. नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा गरज असेल तेव्हाच फ्लॅश लाईटचा वापर करावा.