मुक्तपीठ टीम
काँग्रेस नेते राहुल गांधीसह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे ट्विटरने खाती लॉक करण्यात आली आहेत. मात्र, आपल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगून ट्विटरने सांगितले.. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत भाष्य केलं आहे.” एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा राहुल गांधींवर हल्ला नाही. हा फक्त माझा आवाज बंद करण्यापुरते नाही तर लाखो आणि करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे. “ट्विटर खाते बंद करून एका कंपनीने राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. व्यवसाय करणारी कंपनी राजकारण करण्याचं ठरवत आहे.”, असे राहुल गांधी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, एक राजकारणी म्हणून मला अशा गोष्टी आवडत नाहीत. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा केवळ राहुल गांधींवर हल्ला नाही. हे फक्त राहुल गांधींना गप्प करण्याबद्दल नाही. माझे जवळजवळ १९ ते २० दशलक्ष फॉलोअर्स होते आणि तुम्ही त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखत आहात. हे तुम्ही काय करत आहात?’ ट्विटरने या कृतीने हे सिद्ध केले आहे की न्यूट्रल प्लॅटफॉर्म नाही. गुंतवणूकदारांसाठी ही एक धोकादायक गोष्ट आहे कारण राजकीय स्पर्धेत कोणाची बाजू घेतल्यास ट्विटरसाठी वाईट परिणाम होऊ शकतात.
हा लोकशाहीवर हल्ला होत आहे. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. मीडिया नियंत्रणात आहे. मी समजत होतो की, ट्विटरच आशेचा एक किरण होता जिथे आपण ट्विटद्वारे आपला मुद्दा मांडू शकत होतो. पण ते तसे नाही. हे दर्शवते की ट्विटर हे तटस्थ व्यासपीठ नसून वस्तुनिष्ठ आहे, जे काही लोक त्यांच्या पद्धतीने वापरत आहेत. हे एक पक्षपाती व्यासपीठ आहे आणि ते सध्याचे सरकार जे म्हणते तेच ऐकते. एवढेच नाही तर राहुल गांधींनी देशवासियांना आवाहन केले की, आपण प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही कंपन्यांना त्यांचे राजकारण ठरवण्याचा अधिकार देऊ शकतो कारण सरकार त्यांच्यासोबत आहे? आम्हाला आमच्या स्वतःच्या राजकारणाची व्याख्या करायची आहे की कंपन्यांना असे करायचे आहे?
राहुल गांधींच्या वक्तव्यावर ट्विटरकडून प्रतिक्रिया आली आहे. सोशल मीडिया कंपनीने गुरुवारी पुन्हा एकदा आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे, त्यांनी कोणत्याही पक्षपातीपणाशिवाय न्यायिकपणे आपली कारवाई केली आहे. त्यांनी या फोटोवर कारवाई केली आहे, जी राहुल गांधींसह अनेकांनी शेअर केले आहे. हा फोटो भारत सरकारच्या नियमांचे आणि कायद्यांचे उल्लंघन करते. अशी वैयक्तिक माहिती इतर गोष्टींपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे. आमचे ध्येय कोणत्याही व्यक्तीची गोपनीयता आणि सुरक्षिततेची काळजी घेणे आहे.